pmkmy registration पंतप्रधान किसान मानधन योजना सुरू करून भारत सरकारने लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात, आर्थिक असुरक्षिततेचा जो सामना करावा लागतो, या गंभीर समस्येचे निराकरण करण्याचे काम केले आहे.
शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, देशातील ६० ते ७०% लोक खेड्यात राहतात, देशाच्या जीडीपीमध्ये शेतीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे परंतु शेती हा व्यवसाय निसर्गावर, पावसावर अवलंबून आहे, शेतकरी हा शेतीच्या पिकांवर अवलंबून असतो. यामुळे लहान आणि अत्यल्प भूधारकांना याचा जास्त फटका बसतो.
लहान आणि अत्यल्प भूधारकांना आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो, विशेषत: वृद्धापकाळात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारत सरकारने फेब्रुवारी २०१९ मध्ये PM किसान मानधन योजना (PMKMY) सुरू केली.
ही पेन्शन योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी सुरु करण्यात आली आहे. ही योजना भारताच्या कृषीप्रधान समाजाची जीवनरेखा असलेल्या शेतकऱ्यांना सन्मानित जीवन जगण्यासाठी बनवण्यात आली आहे.
What is 3000 per month scheme? 3000 मासिक पेन्शन योजना काय आहे?
PM किसान मानधन योजना ही एक स्वैच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे जी विशेषतः भारतातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे. या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट लहान आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात नियमित पेन्शन उपलब्ध करून देणे, तसेच त्यांची आर्थिक असुरक्षा कमी करणे हा आहे.
ज्या शेतकऱ्यांकडे २ हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे वय १८ ते ४० वर्षे आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना वयाच्या ६० व्या वर्षानंतर त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी दरमहा ३,०००/- रुपये निश्चित पेन्शन मिळते, आणि काही कारणाने नोंदणीकृत शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर, त्याच्या पत्नीला दरमहा अर्धी म्हणजे रुपये १५००/- पेन्शन मिळते.
जे शेतकरी आधीच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची पीएम किसान मानधन योजनेत PM Kisan Maandhan Yojana स्वयंचलितपणे (Automatic) नोंदणी केली जाते आणि पीएम किसान योजनेंतर्गत त्यांना मिळणाऱ्या लाभांमधून (PM Kisan Samman Nidhi yojna मध्ये वार्षिक रु. ६,०००/- चा आर्थिक लाभ दिला जातो) योगदान वजा केले जाते.
Who is eligible for the maandhan yojana? मानधन योजनेसाठी कोण पात्र आहे?
PM Kisan Maandhan Yojana खालील अटी पूर्ण करणारे शेतकरी PM किसान मानधन योजनेसाठी पात्रता असतील, ते काय आहे आपण पुढे पाहूया Who is eligible for Mandhan?
- वयोगट: या योजनेचा लाभ १८ ते ४० वर्ष वयोगटातील शेतकरीच घेऊ शकतात
- जमिनीची मालकी: अर्जदार हा अल्प किंवा अल्पभूधारक शेतकरी असावा, त्याच्याकडे 2 हेक्टरपर्यंत लागवडीयोग्य जमीन असावी
- मासिक उत्पन्न: ज्या शेतकऱ्याचे मासिक उत्पन्न रुपये १५,०००/- पर्यंत आहे
- उत्पन्नाचे निकष: ही योजना प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठीच आहे. त्यामुळे, आयकर भरणारे किंवा तत्सम पेन्शन योजनांचे आधीच लाभार्थी आहेत ते या योजनेसाठी पात्र नाहीत
- या लोकांना वगळण्यात आले आहे: संस्थात्मक जमीनधारक, सेवारत किंवा सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी, डॉक्टर, अभियंते (Engineer) आणि वकील तसेच इतर पेन्शन योजना लाभार्थी व्यक्तींना या योजनेतून वगळण्यात आले आहे
Register mandhan yojana online apply मानधन योजना रजिस्ट्रेशन
पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे आहे आणि ही प्रक्रिया कशी आहे ते आपण पुढे पाहूया
- स्व-नोंदणी: शेतकरी कॉमन सर्व्हिस सेंटर्स (CSCs) द्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात, तसेच योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.maandhan.in/ वरूनही नोंदणी करू शकतात
- आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची एक प्रत आणि जमिनीच्या मालकीची कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक आहे. आधार क्रमांक शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी जोडलेला असावा
- योगदान: नावनोंदणीच्या वेळी वयानुसार, शेतकऱ्यांनी रु. ५५ – रु. ६०/- पासून वय ६० वर्षा पर्यंत पोहोचेपर्यंत रु. २००/- अशी नाममात्र मासिक रक्कम योगदान म्हणून देणे आवश्यक आहे. सरकार शेतकऱ्यांच्या योगदानाशी समानतेने ५०-५० भागीदारी करते
- पीएम किसानमध्ये स्वयंचलित (Automatic) नावनोंदणी: जे शेतकरी आधीच पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची पीएम किसान मानधन योजनेत स्वयंचलितपणे (Automatic) नोंदणी केली जाते. पीएम किसान योजनेंतर्गत त्यांना मिळणाऱ्या लाभांमधून योगदान वजा केले जाते
Mandhan Yojana Online Registration मी मानधन योजनेत नोंदणी कशी करू शकतो?
- मानधन योजनेत नोंदणी करण्यासाठी, सर्वप्रथम त्याच्या अधिकृत वेबसाइट www.maandhan.in/ वर जावे लागेल
- वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, Services मेनूमध्ये New Enrollment पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लीक करा
- आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, या पेजवर तुम्हाला ३ पर्याय दिसतील त्यामधील सेल्फ एनरोलमेंट (Self Enrollment) या पर्यायावर क्लिक करा
- सेल्फ एनरोलमेंट (Self Enrollment) पर्यायावर क्लिक करताच एक पॉप-अप उघडेल ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून Proseed च्या पर्यायावर क्लिक करा
- तुम्ही एंटर केलेल्या तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला वन टाइम पासवर्ड (OTP) टाकून Proseed बटन वर क्लिक करा
- एक नवीन पेज उघडले जाईल, या पृष्ठावर सर्व आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अशा पद्धतीने तुमची प्रधानमंत्री मानधन योजनेअंतर्गत यशस्वीपणे नोंदणी केली जाऊ शकते
What is the monthly contribution for PM Kisan Mandhan Yojana? पेन्शनचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती मासिक रक्कम गुंतवावी लागते?
मानधन योजनेचा फायदा घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्याना रु. ५५ – रु. ६०/- पासून रु. २००/- पर्यंत वयाच्या ६० वर्षा पर्यंत मासिक रक्कम योगदान म्हणून देणे आवश्यक आहे. हे मासिक योगदान वयानुसार बदलते, या योजनेच्या सेवानिवृत्तीचे वय वर्ष ६० आहे, तपशील खालील तक्त्यात दिला आहे.
मासिक योगदान प्रवेश वय (वर्ष) A | सदस्यांचे मासिक योगदान (रु) B | केंद्र सरकारचे मासिक योगदान (रु) C | एकूण मासिक योगदान (रु) (B+C) |
---|---|---|---|
१८ | ५५ | ५५ | ११० |
१९ | ५८ | ५८ | ११६ |
२० | ६१ | ६१ | १२२ |
२१ | ६४ | ६४ | १२८ |
२२ | ६८ | ६८ | १३६ |
२३ | ७२ | ७२ | १४४ |
२४ | ७६ | ७६ | १५२ |
२५ | ८० | ८० | १६० |
२६ | ८५ | ८५ | १७० |
२७ | ९० | ९० | १८० |
२८ | ९५ | ९५ | १९० |
२९ | १०० | १०० | २०० |
३० | १०५ | १०५ | २१० |
३१ | ११० | ११० | २२० |
३२ | १२० | १२० | २४० |
३३ | १३० | १३० | २६० |
३४ | १४० | १४० | २८० |
३५ | १५० | १५० | ३०० |
३६ | १६० | १६० | ३२० |
३७ | १७० | १७० | ३४० |
३८ | १८० | १८० | ३६० |
३९ | १९० | १९० | ३८० |
४० | २०० | २०० | ४०० |
What is benefit of Mandhan Yojana? मानधन योजनेचा फायदा काय
kisan maandhan yojana पीएम किसान मानधन योजना लहान आणि अल्प भूधारक नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना वयाची ६० पूर्ण झाल्यानंतर त्यांना दरमहा ३,००० रु. पेन्शन प्रदान करते. ही रक्कम दरमहा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केली जाते. शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, लाभार्थीच्या जोडीदाराला (पत्नी) कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून ५०% निवृत्ती वेतन (प्रतिमाह रु. १५००/-) मिळते. तथापि, हा लाभ केवळ जोडीदारास (पत्नीस) लागू आहे आणि कुटुंबातील इतर सदस्यांना लागू होत नाही.
“प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना” सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
How to exit from the PM Mandhan Yojana? पीएम मानधन योजनेतून बाहेर पडण्याचे पर्याय
PM Kisan Maandhan Yojana या योजनेतून मुदतीपूर्वी सुद्धा बाहेर पडू शकतो, मुदतीपूर्वी बाहेर पडू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना अनेक पर्याय देते ते कोणते ते आपण पाहू:
- स्वेच्छेने बाहेर पडणे: जर एखाद्या शेतकऱ्याने वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर शेतकऱ्याने जमा केलेल्या व्याजासह केलेले योगदान त्यांना परत केले जाईल. तथापि, सरकारने केलेले योगदान परत केले जाणार नाही
- लाभार्थीचा मृत्यू: ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, पती / पत्नी एकतर आवश्यक रकमेचे योगदान देऊन योजना सुरू ठेवू शकतात किंवा योजनेतून बाहेर पडू शकतात, अशा परिस्थितीत शेतकऱ्याचे योगदान व्याजासह परत केले जाईल
- अपंगत्व: जर एखादा लाभार्थी वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी कायमस्वरूपी अपंग झाला तर ते बाहेर पडण्याचा पर्याय निवडू शकतात त्याना त्यांचे योगदान व्याजासह परत केले जाईल
What are the documents required for Pradhan Mantri pension Yojana? pmkmy registration प्रधानमंत्री मानधन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
PM मानधन योजनेअंतर्गत पात्र सदस्यांच्या नोंदणीसाठी आवश्यक असलेली अनिवार्य माहिती काय आणि दस्तावेज (documents) काय असतील ते तपशील पाहू.
- शेतकरी / पती / पत्नीचे नाव
- शेतकरी / पती / पत्नीची जन्मतारीख
- बँक खाते क्रमांक
- IFSC/MICR कोड
- मोबाइल क्रमांक
- आधार क्रमांक
- वयानुसार पहिले मासिक योगदान रक्कम
- तसेच पासबुकमध्ये आवश्यक असलेली इतर ग्राहक माहिती
FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न
३००० मासिक पेन्शन योजना काय आहे?
३००० मासिक पेन्शन योजना शेतकऱ्यांना ६० वर्षा नंतर प्रतिमाह ३००० रु. पेन्शन देते, परंतु यासाठी शेतकऱ्यांना आपल्या वयाप्रमाने प्रतिमाह आपले योगदान द्यावे लागते