प्रधानमंत्री मुद्रा योजना pm mudra loan for new business माननीय पंतप्रधान यांनी ८ एप्रिल २०१५ रोजी सुरू केली, या योजनेअंतर्गत लघु/सूक्ष्म उद्योगांना २० लाखांपर्यंत कर्ज देण्यात येते. मुद्रा कर्ज व्यावसायिक बँका, RRB, लघु वित्त बँक, MFI आणि NBFC द्वारे लघु/सूक्ष्म उद्योगांना दिली जातात.
भारत सरकारने सुरू केलेली Micro Units Development & Refinance Agency Ltd. मुद्रा कर्ज योजना देशभरातील लघु आणि सूक्ष्म उद्योगांना सक्षम बनवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. या उपक्रमाचा उद्देश बिगर-कॉर्पोरेट, बिगरशेती लघु/सूक्ष्म उद्योगांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे, तसेच उद्योजकता वाढवणे आणि आर्थिक वाढीस चालना देणे हे आहे. MUDRA कर्ज योजना लहान व्यवसाय मालकांना परवडणारी कर्जे देते, त्यांना त्यांचे कार्य वाढविण्यात, नोकऱ्या निर्माण करण्यात पर्यायाने भारताच्या सर्वांगीण आर्थिक विकासात योगदान देण्यास मदत करते.
What is the objective of MUDRA loan? मुद्रा कर्ज योजनेची उद्दिष्टे
- Financial inclusion in MUDRA loan आर्थिक समावेश: MUDRA कर्ज योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट लहान व्यवसाय मालकांना आर्थिकद्रुष्ट्या मदत करून व्यवसायामध्ये येणाऱ्या पैशाचा अभाव दूर करणे. ही योजना सूक्ष्म-उद्योगांच्या आर्थिक गरजा परवडणाऱ्या कर्जामध्ये उपलब्ध करून देते, मुद्रा कर्ज योजना गरजा आणि उपलब्धता यांच्यामधील अंतर भरून काढण्यासाठी तयार करण्यात आली आहे
- Encouraging entrepreneurship उद्योजकतेला प्रोत्साहन देणे: मुद्रा कर्ज योजना उद्योजकतेला प्रोत्साहन देते, ही योजना लहान व्यवसायांसाठी फायद्याची आहे, लहान व्यवसायांची प्रगती होण्यासाठी एक मजबूत इकोसिस्टम तयार करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
- Employment generation रोजगार निर्मिती :लघु आणि सूक्ष्म उद्योग रोजगार निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. MUDRA कर्ज योजनेचे उद्दिष्ट लघु आणि सूक्ष्म उद्योगांना समर्थन देणे, त्यांना अधिक रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे हे आहे, जेणेकरून देशातील बेरोजगारी कमी होईल
- आर्थिक प्रगती: लहान व्यवसायांना आर्थिक सहाय्य प्रदान करून, मुद्रा कर्ज योजना देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान देते. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याची आणि उत्पादकता वाढविण्यास हि योजना मदत करते.
How many types of MUDRA loans are there? मुद्रा कर्जाचे प्रकार
मुद्रा कर्ज कोणाला कसे आणि किती द्यायचे याची वर्गवारी करण्यात आले आहे, कोणाला किती कर्ज द्यायचे हे सरकारने ठरवलेल्या मापदंडावर अवलंबून आहे. आपण पाहूया मुद्रा कर्जाचे विविध प्रकार कोणते आहेत? What are the different types of Mudra loan?
- Shishu शिशू: छोट्या व्यवसायांच्या सुरवातीच्या काळात म्हणजे स्टार्ट-अप व्यवसायांसाठी शिशू कर्ज दिले जाते. या श्रेणी अंतर्गत रुपये ५०,०००/- पर्यंतचे कर्ज दिले जाते. या प्रकारचे कर्ज उद्योजकांना त्यांचे व्यवसाय स्थापित करण्यात आणि त्यांच्या प्रारंभिक निधी आवश्यकता पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
- Kishore किशोर: मुद्रा कर्ज प्रकारातील दुसरा प्रकार आहे किशोर कर्ज, जे व्यवसाय आधीपासून स्थापित आहेत आणि त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे आशा उद्योजकांना किशोर कर्ज प्रकारातून कर्ज दिले जाते. या श्रेणी अंतर्गत रुपये ५०,००१ ते रुपये ५,००,०००/- पर्यंतचे कर्ज दिले जाते. किशोर कर्ज व्यवसायांना वाढविण्यास मदत करते.
- Tarun तरुण: मुद्रा कर्ज प्रकारातील तिसरा प्रकार आहे तरुण, जे व्यवसाय सुस्थितीत आहेत आणि ज्यांना पुढील विस्तार आणि वाढीसाठी भरीव निधीची आवश्यकता आहे आशा उद्योजकांना तरुण कर्ज प्रकारातून कर्ज दिले जाते. या श्रेणी अंतर्गत रुपये ५००,००१ ते रुपये १०,००,०००/- पर्यंतचे कर्ज दिले जाते. तरुण कर्जे व्यवसायांना त्यांची क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात.
२०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्प मध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर (MSME) भर देण्यात आला आहे. मुद्रा कर्जाची मर्यादा १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये केली जाईल असे अर्थसंकल्पीय भाषणामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
मराठा तरुणांसाठी १० ते ५० लाखापर्यंत बिनव्याजी व्यवसाय कर्ज संपूर्ण माहिती___
pm mudra loan for new business निधीचे प्रकार Types of Mudra Loan
मुद्रा कर्ज योजने अंतर्गत सूक्ष्म उद्योग क्षेत्राचा विकास वाढण्यासाठी मुद्रा कर्ज योजने द्वारे प्रस्तावीत केली जाणारी उत्पादने अनेक विविध क्षेत्रे/व्यवसाय तसेच व्यवसाय/उद्योजक विभागांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे, या योजने अंतर्गत मिळणारा निधी दोन प्रकारामध्ये येतो:
Micro Credit Scheme (MCS) सूक्ष्म क्रेडिट योजना
बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) / लघु आणि मध्यम उद्योग (SMEs) / भागीदारी कंपन्या / स्वयं-मदत गट (SHGs)
- Micro Credit Scheme (MCS) सूक्ष्म क्रेडिट योजना: Micro Credit Scheme सूक्ष्म क्रेडिट योजना प्रामुख्याने मायक्रो फायनान्स संस्थांद्वारे (MFIs) प्रस्तावीत केली जाते, जे विविध सूक्ष्म उद्योग व लहान व्यवसायांसाठी १ लाखांपर्यंतचे कर्ज देते.
- बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFCs) / लघु आणि मध्यम उद्योग (SMEs) / भागीदारी कंपन्या / स्वयं-मदत गट (SHGs): वाणिज्य बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँका आणि NBFC सारख्या विविध बँका सूक्ष्म उद्योगानां MUDRA मुद्रा कर्ज देण्यास पात्र आहेत. १० लाख प्रति युनिट पर्यंत पुनर्वित्त मुदत कर्ज आणि खेळते भांडवल कर्ज देते. तसेच महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बँका/MFI त्यांच्या कर्जावरील व्याज कपात करून अतिरिक्त सुविधा देऊ शकतात. सध्या, MUDRA महिला उद्योजकांना कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या MFIs/NBFC यांना व्याजदरात 25bps (Basis Points) ची कपात करते.
What is the purpose of MUDRA? मुद्रा कर्जाचा उद्देश
मुद्रा कर्ज व्यवसाय चालू करण्यासाठी, वाढवण्यासाठी मिळते प्रत्येक उगोजकाचा मुद्रा कर्ज घेण्याचा उद्देश वेगवेगळा असू शकतो, हे कर्ज विविध कारणांसाठी मिळू शकते हे आपण पाहू.
- व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी
- यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करण्यासाठी
- खेळते भांडवलाची आवश्यकता असेल तर
- तंत्रज्ञानाचे अपग्रेडेशन करण्यासाठी
- पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी
- विपणन आणि प्रचारात्मक (Marketing and promotional) करण्यासाठी
What are the documents needed for a Mudra loan? मुद्रा लोन साठी काय काय कागदपत्रे लागतात?
लाडका भाऊ’ योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची आवशकता आहे ते कोणते आहेत ते खाली दिले आहेत
- फोटो ओळख पुरावा Photo ID proof
- वर्तमान घरचा पत्ता पुरावा Elec. Light bill ect.
- उत्पन्नाचा पुरावा – ITR
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
- कर्ज अर्ज भरलेला फॉर्म
- निवास/कार्यालयाचा मालकीचा पुरावा
- व्यवसायात करत असल्याचा पुरावा
Who is eligible for a Mudra loan? मुद्रा कर्जासाठी कोण पात्र आहे?
- अर्जदार भारतीय नागरिक असावा
- अर्जदाराचे वय १८ ते ६५ वर्षे असावे
- अर्जदाराचा मागील कर्जाचा इतिहास म्हणजे मागील सर्व कर्ज व्यवस्थित भरलेलं असावे, कर्ज चुकवलेले नसावे
- अर्जदाराने आपला व्यवसाय MSME मध्ये नोंदणी केलेला असावा, MSME चे प्रमाणपत्र असावे
What is the process of a Mudra loan? मुद्रा कर्जाची प्रक्रिया काय आहे?
मुद्रा कर्ज मिळवण्यासाठी दोन प्रक्रिया आहेत ऑफलाइन किंवा ऑनलाइन प्रक्रिया. या दोन्ही प्रक्रियेने मुद्रा कर्ज मिळवू शकतो, पूर्ण तपशील पुढे पाहू
- ऑफलाइन: आवश्यक कागदपत्रासहित आपल्या शेजारील बँकेत जाऊन मुद्रा कर्जासाठी अर्ज भरून यामध्ये आपल्या व्यवसायाची पूर्ण माहिती देऊन ऑफलाइन अर्ज दाखल करू शकतो, आपल्या अर्जाची छाननी करून बँक आपल्याला मुद्रा कर्ज मंजूर करते
- ऑनलाइन: ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून महाराष्ट्र शासनाचे मुद्रा योजनेचे वेब पोर्टल उघडेल तेव्हा पॉपअप मध्ये येणार अर्ज भरून अर्ज जतन (Submit) करा. Menu Bar मध्ये कर्जाचे स्वरूप या पर्यायावर क्लिक करून मुद्रा कर्ज दाखल करू शकतो
FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न
मुद्रा कर्जासाठी कोण पात्र आहे?
ज्या अर्जदाराचा व्यवसाय MSME मध्ये नोंदणीकृत आहे व तो भारतीय नागरिक आहे आणि त्याचे वय १८ ते ६५ वर्षा पर्यंत आहे तो मुद्रा कर्जासाठी पात्र आहे.
मुद्रा कर्जावर काही सबसिडी आहे का?
मुद्रा कर्जावर सबसिडी नाही आहे पण कमी व्याजदरावर २० लाखापर्यंत कर्ज मिळते.
मुद्रा कर्जाचे तीन टप्पे काय आहेत?
मुद्रा कर्ज तीन श्रेणींमध्ये उपलब्ध आहे. शिशू , किशोर आणि तरुण आशा ३ श्रेणी आहेत, शिशू अंतर्गत ५० हजार पर्यंत, किशोर अंतर्गत ५ लाखापर्यंत आणि तरुण श्रेणी अंतर्गत २० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
मुद्रा कर्ज न भरल्यास काय?
मुद्रा कर्ज न भरल्यास कायदेशीर कार्यवाही होईल