PM Kisan Samman Nidhi Yojana 2024 : पीएम किसान पुढील हप्त्याची स्थिती तपासा

PM Kisan Samman Nidhi Yojana

PM Kisan Samman Nidhi Yojana या योजनेंतर्गत, भारत देशातील सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी २०००/- रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येक कुटुंबाला वार्षिक रु.६०००/- चा आर्थिक लाभ दिला जातो.

Table of Contents hide

What is PM Kisan Samman Nidhi Yojana काय आहे पीएम किसान योजना?

खेडेगावात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाची भिस्त हि शेतीवर असते तसेच शेती हि शेतकरयांच्या कष्ठावर आणि प्रामुख्याने हवामान व पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असते त्यामुळे बहुतांश शेतकरी हे तोट्यातच असतात त्यामुळे शेतकऱ्यांना सामान्य गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या अनेक संकटांना सामोरे जावे लागते. म्हणून केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची सुरवात केली.

२४ फेब्रुवारी २०१९ रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना” (PM KISAN) सुरु करण्यात आली, या योजनेअंतर्गत देशातील सर्व जमीनधारक शेतकरी (अल्प व अत्यल्प भूधारक) कुटुंबांना कृषी उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदत निधी प्रदान केला जातो. लाभार्थी शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६०००/- रु. दिले जातात, दर चार महिन्याने प्रत्येकी २०००/- रु. शेतकऱ्याच्या बँक खात्यात पाठवले जातात.

पी एम किसान निधी देत असताना तो निधी संबंधीत शेतकऱ्याला पूर्ण स्वरूपात मिळावा याची केंद सरकारने पुरेपूर तजवीज केली आहे, शेतकऱ्याला मिळणारा निधी हा थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये वर्ग केला जातो, जेणेकरून या निधी मध्ये कोणता घोटाळा होऊ नये.

सुरवातीला या योजनेचा लाभ २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबालाच मिळत असे, परंतु काही दिवसानंतर हेक्टरची मर्यादा रद्द करून हि योजना सरसकट सर्व जमीनधारक शेतकऱ्यांसाठी खुली करण्यात आली. २ हेक्टर जमिनीची मर्यादा रद्द केल्याने लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे, आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

who is not eligible for pm kisan samman nidhi Yojna पीएम किसानसाठी कोण पात्र नाहीत?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही सर्व जमीन धारक शेतकऱ्यांसाठी असली तरी काही श्रेणीतील शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत, खाली दिलेल्या श्रेणीतील शेतकरी/व्यक्ती या योजनेचे फायदे मिळवण्यास पात्र नाहीत.

  • सर्व संस्थात्मक जमीनधारक
  • लोकसभा/राज्यसभा/राज्य विधानसभा/राज्यांचे सदस्य
  • विधानपरिषद, महानगरपालिका, जिल्हा पंचायतींचे आजी/माजी मंत्री किंवा पदावर असणारे/पद भूषवलेली व्यक्ती
  • केंद्र/राज्यातील सर्व सेवेत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी
  • आयकर भरणारी व्यक्ती
  • दहा हजार पेक्षा जास्त निवृत्ती वेतन घेणारी व्यक्ती
  • नोंदणीकृत डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, सनदी लेखापाल (CA), आणि वास्तुविशारद (Architects)

PM Kisan Samman Nidhi Yojana Eligibility पी एम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास कोण पात्र आहेत

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजने अंतर्गत लाभ मिळण्यास सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबे पात्र आहेत, ज्यांच्या नावे शेतीयोग्य जमीन आहे अशी सर्व कुटुंब या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत, सुरवातीला २ हेक्टर पर्यत शेती असणाऱ्या कुटुंबालाच लाभ मिळत परंतु आता २ हेक्टर शेतीची मर्यादा रद्द करून सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांसाठी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना लागू करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत येणारे ‘कुटुंब’

पी एम किसान सम्मान निधी योजने अंतर्गत येणाऱ्या जमीनधारक शेतकरी कुटुंबामध्ये पती, पत्नी आणि त्यांची अल्पवयीन मुले आहे, ज्यांच्याकडे संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या जमिनीच्या नोंदीनुसार लागवडीयोग्य जमीन आहे. पी एम किसान योजनेच्या लाभाच्या मोजणीसाठी लाभार्थी ओळखण्यासाठी विद्यमान जमीन-मालकी प्रणाली वापरली जाईल.

PM Kisan Samman Nidhi Yojna documents पी एम किसान पोर्टलवर सबमिट करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

पी एम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत नाव नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी पी एम किसान पोर्टलवर खालील माहिती/कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

  • शेतकऱ्याचे नाव, वय, लिंग आणि जात प्रवर्ग (SC/ST)
  • आधार क्रमांक
  • बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड
  • मोबाईल नंबर

Step-by-step guide for PM Kisan registration मी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी कशी करू शकतो?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम इच्छुक लाभार्थींनी PM KISAN पोर्टल वरून अर्ज करणे आवश्यक आहे. खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा.

  • सर्व प्रथम, अर्जदारास योजनेच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in/ भेट द्यावी लागेल
  • अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ ला भेट दिल्यानंतर मुख्यपृष्ठ उघडेल
  • या मुख्य पृष्ठावर आल्यावर आपल्याला पृष्ठाच्या उजव्या बाजूला New Farmer Registration चा पर्याय दिसेल किंवा Farmer Corner (शेतकरी कॉर्नर) हा मथळा Title दिसेल त्याच्या खाली New Farmer Registration (नवीन शेतकरी नोंदणी) पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा
  • New Farmer Registration या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन शेतकरी नोंदणी फॉर्म उघडेल जो तुम्हाला भरायचा आहे.
  • दिलेल्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, आपले राज्यासह प्रतिमा कोड (Captcha Code) भरावा लागेल आणि Get OTP बटणावर क्लिक करून आपल्या मोबाईलवर आलेला कोड प्रविष्ट करावा
  • OTP नंबर सह पुन्हा प्रतिमा कोड (Captcha Code) भरून सबमिट बटन वर क्लिक केले असता पुन्हा Aadhar OTP प्रविस्ट करा व Verify Aadhaar OTP बटन वर क्लिक करा
  • नवीन फॉर्म उघडेल ज्यामध्ये तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका, गाव यासह फॉर्म मध्ये विचारलेली तुमची व तुमच्या जमिनीची सर्व माहिती भरायची आहे आणि तुमच्या जमिनीचा ७/१२ उतरा ची प्रत जोडून SAVE बटणावर क्लिक करून सबमिट करायचे आहे
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर नोंदणी फॉर्मची एक प्रिंट आउट घ्या आणि जतन करून ठेवा कारण भविष्यात त्याची गरज लागेल, अशा रीतीने नवीन शेतकऱ्यांचे नोंदणी Registration केले जाते

PM Kisan ekyc पी एम किसान सन्मान निधी योजना eKYC कसे कराल

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत मिळणाऱ्या निधी साठी शेतकऱ्यांना आपले eKYC करणे अनिवार्य आहे, खाली दिलेल्या तीन पद्धतीनुसार शेतकरी स्वतःच आपले eKYC करू शकतात.

  • PM-KISAN या वेब पोर्टलवर जाऊन, उजव्या बाजूला e-KYC बटन असेल ते प्रेस करावे
  • नवीन पृष्ठ (Page) उघडेल, OTP Based Ekyc मथळा (Title) च्या खाली Aadhar Number प्रविष्ट करा व Search बटन वर क्लीक करा
  • तुमचा Aadhar नंबरशी लिंक असणारा मोबाईल नंबर विचारला जाईल तो प्रविष्ट करा व Get Mobile OTP बटन वर क्लीक करा
  • तुमच्या मोबाइलवर आलेला OTP प्रविष्ट करून Submit OTP बटन वर क्लीक करा
  • तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्या मोबाईल वर आलेल्या नवीन Aadhar OTP प्रविष्ट करून Submit बटन वर क्लीक केले असता “Ekyc has been done succeddfully” असा मेसेज दिसेल म्हणजे तुमचे Ekyc यशस्वीरित्या झाले आहे
  • Google Play Store वरून PMKISAN GoI अँप डाउनलोड करून फेस ऑथेंटिकेशन (चेहरा स्कॅन) द्वारे आधार मोबाइल नंबर लिंक करून eKYC स्वतः करू शकतात
  • किंवा शेजारील CSC (Common Service Centers) केंद्रांशी संपर्क साधून eKYC करू शकता. eKYC करून घेण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत आहे

PM Kisan Samman Nidhi Status पी एम सन्मान निधी योजना eKYC स्थिती कसे तपासावे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला eKYC करणे अत्यंत गरजेचे आहे कारण eKYC केले नाही तर निधी मिळणार नाही म्हणून eKYC स्थिती तपासून पाहणे गरजेचे आहे, पुढे दिलेल्या पद्धतीनुसार आपण आपली eKYC स्थिती तपासू शकता

  • PM-KISAN या वेब पोर्टलवर जाऊन, उजव्या बाजूला Know Your Status पर्याय असेल ते प्रेस करावे
  • नवीन पृष्ठ (Page) उघडेल, Know Your Status मथळा (Title ) च्या खाली विचारल्याप्रमाणे eKYC Registration नंबर प्रविष्ट करून प्रतिमा कोड (Captcha Code) भरून Get Data बटन वर क्लिक करा
  • Get Data बटन वर क्लिक केले असता Eligibility Status मध्ये सर्व पर्यायापुढे Green टिक सह Yes असे लिहिलेले असेल तर आपले eKYC यशस्वी झाले आहे, आणि पुढील येणारा प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर नक्की येईल

PM Kisan beneficiary list शेतकरी लाभार्थी यादी कशी तपासावी

पुढे दिलेल्या पद्धतीनुसार आपण आपले नाव पी एम किसान योजना लाभार्थी यादी मध्ये आहे कि नाही ते तपासू शकता

  • PM-KISAN या वेब पोर्टलला म्हणजे वेबसाइटला भेट द्या
  • लाभार्थी यादी (Beneficiary list) वर क्लिक करा
  • विचारलेल्या माहितीनुसार आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव यासारखे तपशील प्रविष्ट करा आणि अहवाल मिळवा Get report वर क्लिक करताच लाभार्थ्यांची यादी प्रदर्शित होईल त्या यादीमध्ये आपले नाव शोधा

पीएम किसान पुढील हप्त्याची स्थिती तपासा

PM किसान योजनेच्या पुढील हप्त्याची तुमची स्थिती पाहायची असेल, तर खाली दिलेल्या प्रक्रियेचे काळजीपूर्वक पालन करा.

  • सर्वप्रथम तुम्हाला https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल
  • अधिकृत वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला Know Your Status (तुमची स्थिती) हा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा
  • क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल. तेथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकायचा आहे आणि मोबाईलवर आलेला OTP टाका
  • त्यानंतर तुम्ही View Status (व्ह्यू स्टेटस) पर्यायावर क्लिक करून तुमच्या पुढील हप्त्याची स्थिती तपासू शकता

FAQ : सतत विचारले जाणारे प्रश्न

शेतकऱ्यांना 6000 रुपये कसे मिळतील?
सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना दर चार महिन्यांनी प्रत्येकी २०००/- रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला रु.६०००/- मिळतील.

पीएम किसान योजनेत किती हप्ते आहेत?
सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी चार महिन्याला रु. २०००/- प्रमाणे वर्षाला तीन समान हप्ते आहेत

मी पीएम किसान ऑनलाइन अर्ज करू शकतो का?
हो, प्रत्येक शेतकरी आपल्या मोबाईल वरूनही पीएम किसान ऑनलाइन अर्ज करू शकतो

कोणत्या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 मिळतात?
प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला प्रत्येकी तीन हप्त्यांमध्ये 6000/- रुपय मिळतात

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणतीही महत्त्वाची बातमी कधीही चुकवू नका. आमची सदस्यता घ्या.

ताज्या बातम्या

केंद्र सरकार योजना

Related News