National Pension Scheme (NPS) निवृत्तीनंतरचा आधार, राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे काय? जाणून घ्या
राष्ट्रीय पेन्शन योजना NPS हा निवृत्तीनंतर सुरक्षीत भविष्यासाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी केलेली योजना आहे. वृद्धापकाळात बहुतेक लोकांकडे नियमित उत्पन्नाचा स्रोत नसतो, दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई अशा वेळी त्याना आर्थिक सुरक्षा देण्याचे काम हि योजना करते जेणेकरून प्रत्येक व्यक्ती आपल्या निवृत्ती नंतरही आपले आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकेल. देशातील प्रत्येक नागरिकाला पुरेशी सेवानिवृत्ती उत्पन्न मिळवून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाने २००४ मध्ये हि योजना देशात लागू केली. सुरूवातीला हि योजना फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु २००९ नंतर हि योजना सर्व श्रेणीतील लोकांसाठी खुली करण्यात आली.
या योजनेअंतर्गत ग्राहकांला वय वर्ष ६० पूर्ण झाल्यानंतर जमा झालेल्या पेन्शन किमतीपैकी किमान ६०% रक्कम ग्राहकांना पेन्शन स्वरुपात दिली जाते आणि उर्वरित रक्कम ग्राहकाला एकरकमी पेमेंट म्हणून दिली जाते. तथापि एकूण जमा झालेला निधी रु. ५ लाख पेक्षा कमी असल्यास. ग्राहक आपले १००% पैसे काढू शकतात. या योजनेत गुंतवणूक करण्याची वय मर्यादा ६० वर्षा पर्यंत असली तरी ग्राहक आपल्या इच्छेनुसार ७५ वर्षापर्यंत वाढवू शकतो परंतु त्यासाठी ६० वर्षे पूर्ण होण्याच्या १५ दिवस आधी सांगावे लागते.
ग्राहक ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी सुद्धा राष्ट्रीय पेन्शन योजने मधून बाहेर पडू शकतो, जर त्याने या योजने मध्ये १० वर्षे पूर्ण केली असतील तर ग्राहकाला खात्यावर जमा असलेल्या एकूण रकमेच्या २०% रक्कम मिळते. तर उर्वरीत ८०% रक्कम ही ग्राहकाच्या वयाच्या साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर पेन्शन स्वरुपात दिली जाते. एकूण जमा झालेला निधी रु. २.५ लाख पेक्षा कमी असल्यास, ग्राहक आपले १००% पैसे काढू शकतो.
Can I open NPS account in any bank? एनपीएस खाते कोण उघडू शकतो
अर्जदार हा भारताचा नागरिक असावा मग तो निवासी किंवा अनिवासी भारतीय असला तरी चालेल आणि अर्ज करणाऱ्या तारखेपर्यंत अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे
What are the benefits of NPS? NPS योजनेची वैशिष्ट्ये
- NPS ही सर्वात कमी किमतीची पेन्शन योजना आहे. प्रशासकीय शुल्क आणि निधी व्यवस्थापन शुल्कही सर्वात कमी आहे
- टियर I – पेन्शन खाते हे खाते अनिवार्य आहे या खात्यांतर्गत कर सवलतीचा लाभ उपलब्ध आहे.
- टियर II – हे पर्यायी गुंतवणूक खाते आहे या खात्यांतर्गत कोणताही कर लाभ मिळत नाही परंतु निधी कधीही काढता येऊ शकतो
- टियर I साठी A/C उघडताना किमान योगदान रु.500 आहे आणि वर्षभरात किमान एकूण योगदान रु. 1,000
- टियर II साठी A/C उघडताना किमान योगदान रु.1,000 आहे आणि वर्षभरात किमान एकूण योगदान आपल्यावर आहे
- इतर गुंतवणुकी पेक्षा या योजनेमधील गुंतवणुकेचा परतावा जास्त मिळतो
- अर्जदार देशाच्या कोठूनही हे खाते ऑपरेट करू शकतो आणि अर्जदाराचे शहर, नोकरी बदलली तरीही eNPS द्वारे खाते चालू ठेवू शकतो. ग्राहकाला रोजगार मिळाल्यास खाते सरकारी क्षेत्र, कॉर्पोरेट मॉडेल यासारख्या इतर कोणत्याही क्षेत्रात हलवले जाऊ शकते.
- अर्जदार आपल्या गुंतवणुकीचा पर्याय आणि पेन्शन फंड निवडू शकतो किंवा चांगले परतावा मिळवण्यासाठी ऑटो पर्यायही निवडू शकतो.
- या योजनेत 75 वर्षांपर्यंत योगदान देण्याची किंवा वयाच्या 75 वर्षापर्यंत पैसे काढणे पुढे ढकलण्याची तरतूद मिळते.
What is the difference between NPS Type 1 and Type 2? दोन प्रकारची पेन्शन खाती पुढील प्रमाणे
- टियर I -टियर 1 NPS खाते हे एक सेवानिवृत्ती खाते आहे जे NPS लाभ मिळवायचे असल्यास अनिवार्य आहे. NPS टियर 1 खाते उघडल्यानंतर त्या ग्राहकाला कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक (PRAN) दिला जातो जो NPS खात्यासाठी विशिष्ट ओळख क्रमांकाप्रमाणे काम करतो. टियर 1 एनपीएस खाते उघडण्यासाठी किमान रु.५००/- ची आवशकता असते. त्यानंतर ६० वर्षा पर्यंत सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी दरवर्षी कमीतकमी 1000 किंवा अधिक गुंतवू शकता. वयाच्या ६० व्या वर्षी, तुम्हाला तुमच्या एकूण जमा झालेल्या निधीपैकी ६०% पर्यंत पैसे काढण्याची परवानगी असते. उर्वरित ४०% पेन्शन स्वरुपात दिली जाते. आयकर कायदा, 1961 च्या कलम 80C च्या अंतर्गत २ लाखापर्यंत कर सवलत मिळू शकते.
- टियर II – हे एक ऐच्छिक खाते आहे हे खाते उघडण्यासाठी टियर १ खाते आवश्यक आहे.या खात्यामध्ये ठेवी आणि पैसे काढण्याच्या बाबतीत ठराविक असे नियम लागू नाहीत. टियर २ एनपीएस खाते उघडण्यासाठी किमान रु.१०००/- सह हे खाते उघडू शकता. या खात्यामध्ये दरवर्षी किमान एकदा गुंतवणूक करणे अनिवार्य नाही, आपल्या बचत खात्याप्रमाणेच हे खाते चालू ठेवू शकतो.
How do I open the NPS account? राष्ट्रीय पेन्शन खाते कसे उघडाल
राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते दोन मार्गाने उघडू शकतो एक तर POP-SP (पॉइंट ऑफ प्रेझेन्स सर्व्हिस प्रोव्हायडर) मध्ये जाऊन POP-SP म्हणजे एखादी बँक किंवा पोस्ट ऑफिस असू शकते. किंवा eNPS च्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता, आपण पुढे पाहू दोन्ही पद्धती.
- राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते उघडण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला PRAN (कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक) अर्ज करणे गरजेचे आहे. ऑफलाइन पद्धतीने आपल्याला राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते उघडायचे असल्यास सर्वप्रथम आपल्या नजीकच्या POP-SP (पॉइंट ऑफ प्रेझेन्स सर्व्हिस प्रोव्हायडर) ला भेट द्या जे कि बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिस असू शकते. त्या शाखेत जाऊन आपल्या KYC कागदपत्रांसह PRAN अर्ज सादर करा. अर्ज सादर केल्या नंतर POP-SP मधून तुम्हाला एक पावती क्रमांक दिला जाईल, त्या पावती क्रमांकाच्या साहायाने खालील लिंकवर जाऊन PRAN अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता https://cransdl.com/CRA/pranCardStatusInput.do काही दिवसामध्ये आपल्याला PRAN (कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक) दिला जातो, जो कि तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठवला जातो.
- किंवा खालील संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पेन्शन योजनेचे खाते उघडू शकता https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html ऑनलाईन पद्धतीने खाते उघडायचे असेल तर त्यासाठी आपला मोबाइल नंबर, आधार कार्ड, ईमेल आयडी आणि नेट बँकिंग सुविधा सक्षम असलेले सक्रिय बँक खाते असावे. वरती दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन खाते उघडण्याची पद्धत सांगितलेली आहे ती नीट तपासून आपला अर्ज करावा
How many NPS accounts can a person open? एक व्यक्ती किती NPS खाते उघडू शकतो?
NPS खाते उघडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस PRAN (कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक) दिला जातो. आणि PRAN क्रमांक हा एका व्यक्तीस एकदाच दिला जातो म्हणजे नवीन खाते उघडण्याची गरजही नाही. जुने NPS खाते एका बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर होऊ शकते.
How much amount of NPS is tax-free? योजनेवर मिळवा कर सवलतीचा अतिरिक्त लाभ
राष्ट्रीय पेन्शन योजने मध्ये योगदान देत असलेल्या नोकरदाराला त्यांच्या स्वतःच्या योगदानावर तसेच त्यांच्या नियोक्ताच्या योगदानावर खालीलप्रमाणे कर लाभ मिळतील
- कर्मचार्यांचे स्वतःचे योगदानावर कलम 80 CCD(1) अंतर्गत तुमच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या १०% पर्यंत कर वाचवू शकता, कलम 80 CCE याची मर्यादा 1.50 लाखापर्यंत आहे.
- स्वयंरोजगारासाठी कलम 80 CCD (1) अंतर्गत एकूण वार्षिक उत्पन्नाच्या १०% पर्यंत कर वाचवू शकता, कलम 80 CCE याची मर्यादा 1.50 लाखापर्यंत आहे. या व्यतिरिक्त कलम 80CCD 1(B) अंतर्गत आपल्या खात्यात अतिरिक्त 50,000/- ची गुंतवणुक करू शकतो
- राष्ट्रीय पेन्शन योजने मध्ये योगदान करणाऱ्या व्यक्तीने निवृत्त झाल्यानंतर या योजनेतील सर्व पैसे एकत्र काढले तरी त्याच्यावर व्याज लागणार नाही
- Partial withdrawal वर कोणतेच व्याज लागणार नाही
- पेन्शन फंड व्यवस्थापक वर्षातून एकदा किंवा वर्षातून दोन वेळा आपली योजना बदलली तर त्याच्यावर व्याज लागणार नाही.
केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना सुरु करून सर्व क्षेत्रातील लोकांचा विचार केला आहे. सुरवातीला फक्त सरकारी लोकांना सुरु केलेली हि योजना नंतर सर्वांसाठी खुली केली. कारण २००४ च्या आधी बहुसंख्य लोक असे होते कि त्यांना निवृत्ती वेतन मिळत नसे, म्हणून मग केंद्र सरकारने २००९ ला हि योजना सर्वांसाठी खुली केली. आता पर्यंत या योजनेचा लाभ लाखो लोकांनी घेतला आहे आणि आपले निवृत्तीनंतरचे आयुष्य सुरक्षित केले आहे.
FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न
राष्ट्रीय पेन्शन योजनेचे फायदे काय आहेत?
FD पेक्षा जास्त परतावा मिळवू शकतो, वार्षिक उत्पन्नातुन १०% पर्यंत कर वाचवू शकतो
NPS योजनेसाठी पात्रता काय आहे?
अर्जदार हा भारताचा नागरिक असावा मग तो निवासी किंवा अनिवासी भारतीय असला तरी चालेल आणि अर्ज करणाऱ्या तारखेपर्यंत अर्जदाराचे वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असावे
NPS ची किती रक्कम करमुक्त आहे?
NPS अकाउंट मधून एकरकमी रक्कम काढल्यास एकूण निधीच्या ६०% पर्यंत रक्कम करमुक्त आहे.