Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 | गरिबांचे उपचार होणार निःशुल्क

mahatma jyotiba phule jan arogya yojana

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana भारत देशातील बहुसंख्य लोक आर्थिक दृष्टया दुर्बल आहेत, त्यांचे पोट हातावर चालते; रोज काम करणार तेव्हा खाणार अशा दारिद्रयरेषेखालील कुटुंबांना रोज आर्थिक आव्हाणांचा सामना करावा लागतो.

Table of Contents hide

राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील (केशरी शिधापत्रिका धारक) कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे. अशा कुटुंबांना सरकारतर्फे दर्जेदार निशुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते.

महागाईचा भस्मासुर सर्वाना गिळंकृत करायला टपला आहे, आणि वैद्यकीय उपचार घेणे लोकांना परवडत नाही. आर्थिक दृष्टया दुर्बल कुटुंबातील कोणी आजारी पडला तर उपचारासाठी पैसे नसतात. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना आर्थिक मदतीची गरज असते. म्हणून महाराष्ट सरकार घेऊन आली आहे ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया.

“आयुष्मान भारत योजना” सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana 2024 गरिबांचे उपचार होणार निःशुल्क, महात्मा ज्योतिबा फुले योजना काय आहे?

सन १९९७ मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी गरीब लोकांसाठी ‘जीवनदायी योजना’ सुरू केली होती ज्यामध्ये फक्त ४ अत्यंत गंभीरआजार समाविष्ट होते परंतु या योजनेत काही उणीवा होत्या.

कालांतराने महाराष्ट्र सरकारने जुन्या ‘जीवनदायी योजने’ मध्ये सुधारणा करून आणि ९९६ प्रकारच्या शस्त्रक्रिया, उपचार, प्रक्रियांचा समावेश करून माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावावरून तिचे नाव ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ असे ठेवण्यात आले.

ही योजना २ जुलै २०१२ रोजी प्राथमिक तत्वावर महाराष्ट्र राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली. १ एप्रिल २०१७ मध्ये या योजनेचे नाव बदलून ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ असे ठेवण्यात आले.

या योजनेअंतर्गत ९९६ आजारांसह नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरवली जाते; महाराष्ट्रातील दारिद्र रेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील कुटंबातील लोकांना निशुल्क आणि चांगल्या वैद्यकीय सेवा मिळाव्या या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हि योजना लागू केली आहे. आता पर्यंत महाराष्ट्रातील अनेक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

Who is eligible for Mahatma Jyotiba Phule? महात्मा फुले योजनेसाठी कोण पात्र आहेत?

महाराष्ट्र राज्यात ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना हि प्रधानमंत्री जन आरोग्य योजने सोबत एकत्र राबवण्यात येते. सध्या या योजनेत ३० निवडक सेवांतर्गत ९९६ प्रकारचे गंभीर व खर्चिक उपचार तसेच १२१ शस्त्रक्रिया सेवांसह (फॉलोअप) उपलब्ध करून देण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाच्या सामाजिक व आर्थिक गोष्टींचा विचार करून ३ गटांमध्ये विभागले आहे, गट अ, गट ब आणि गट क. ९९६आजारांवरील उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.१.५० लाख व मुत्रपिंड प्रत्यारोपणासाठी रू. २.५० लाख पर्यंत आर्थिक विमा स्वरक्षण दिले जाते.

त्याचप्रमाणे २१३ अंतर्भूत असलेल्या उपचाराकरिता ५ लाखापर्यंत आरोग्य संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटी हमी तत्त्वावर पुरवित आहे.

गट लाभार्थ्यांचा तपशील
गट अ महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हयांमधील पिवळी, केशरी शिधापत्रिकाधारक (वार्षिक उत्पन्न रु. १ लाख पर्यंत) असलेली कुटुंबे
गट ब शेतकरी आत्महत्याग्रस्त असलेल्या १४ जिल्हयातील (छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा) शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे
गट क शासकीय अनाथाश्रमातील मुले, महिला, जेष्ठ नागरिक, जनसंपर्क कार्यालयाच्या निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबित असलेले कुटुंब सदस्य, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे

 

What is free medical treatment for poor in Maharashtra? महात्मा फुले जन आरोग्य योजना आजार यादी

‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत महाराष्ट्रातील दारिद्र रेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील कुटंबातील लोकांना निशुल्क आणि चांगल्या वैद्यकीय सेवा दिल्या जातात आणि या योजने अंतर्गत ९७१ आजारांवर निशुल्क उपचार केले जातात. या आजारांमध्ये नक्की कोण कोणते आजार आहेत ते आपण पाहूया.

क्रमांक आजाराचे नाव क्रमांक आजाराचे नाव
हृद्यारोग १६ नवजात आणि बालरोग वैद्यकीय
हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी शस्त्रक्रिया १७ बालरोग शस्त्रक्रिया
कॅन्सर शस्त्रक्रिया १८ बालरोग कर्करोग
फुफ्फुसे आजार १९ प्रसूतिशास्त्र आणि स्त्रीरोग
ENT शस्त्रक्रिया २० भाजणे
सामान्य शस्त्रक्रिया २१ हाडांचे आजार
त्वचेसंबंधीचे आजार व शस्त्रक्रिया २२ रक्तविज्ञान
मुतखडा (किडनी स्टोन) २३ प्लास्टिक सर्जरी
मूत्रपिंडाचे आजार २४ मानसिक विकार
१० संसर्गजन्य रोग २५ संधिवातशास्त्र
११ न्यूरोसर्जरी २६ नेत्ररोग
१२ मूत्रविज्ञान (जननेंद्रियाची शस्त्रक्रिया) २७ न्यूरोलॉजी
१३ जठरांत्रमार्गाचे रोग २८ सर्जिकल ऑन्कोलॉजी
१४ ओरल आणि मॅक्सिलोफेशियल शस्त्रक्रिया २९ इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी
१५ कॅन्सर शस्त्रक्रिया ३० एंडोक्राइनोलॉजी (अंत:स्रावी ग्रंथी)

 

Easy Enrollment in Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana: मला महात्मा फुले जन आरोग्य योजना कार्ड कसे मिळेल?

महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजने अंतर्गत लाभ घायचा असेल तर सर्व प्रथम या योजनेंतर्गत पॅनेल केलेल्या रुग्णालयाची यादी पाहून आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन खाली दिलेल्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा.

महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेंतर्गत पॅनेल केलेल्या सर्व रुग्णालयामध्ये या योजनेचे प्रतिनिधी, आरोग्यमित्र असतात जे तुम्हाला हेल्थ कार्ड मिळवून देण्यास मदत करतात, बहुतांश रुग्णालयामध्ये या योजनेसाठी वेगळी विंडो (खिडकी) उपलब्ध करून दिली जाते.

What documents are required for Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana?: आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • केशरी/ पिवळे शिधापत्रिका
  • पॅन कार्ड
  • ओळखपत्र
  • मतदार आयडी कार्ड
  • ड्रायव्हिंग लायन्स
  • शाळा/कॉलेज आयडी
  • पासपोर्ट
  • स्वातंत्र्य सैनिक ओळखपत्र
  • RGJAY/MJPJAY चे हेल्थ कार्ड
  • अपंग प्रमाणपत्र
  • फोटोसह राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक
  • केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने जारी केलेले ज्येष्ठ नागरिक कार्ड
  • सैनिक मंडळाने जारी केलेले संरक्षण माजी सैनिक कार्ड
  • सागरी मत्स्यपालन ओळखपत्र
  • महाराष्ट्र सरकार/भारत सरकारने जारी केलेला कोणताही फोटो आयडी पुरावा

 

Districtwise And Speciality wise Hospital List: जिल्हानिहाय आणि विशेष रुग्णालयाची यादी

  • सर्व प्रथम https://www.jeevandayee.gov.in/ या संकेतस्थळावर जा
  • पोर्टलच्या होम पेजवरून मेनू बारवर जा आणि नेटवर्क हॉस्पिटल्स निवडा
  • स्क्रीनवर एक ड्रॉप-डाउन सूची उघडेल जिथून तुम्हाला “Districtwise And Speciality wise Hospital List” पर्याय निवडण्याची आवश्यकता आहे.
  • नवीन पृष्ठ उघडेल तिथे महाराष्ट्रातील सर्व जिल्हे दिसतील, तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे
  • नवीन पृष्ठ उघडेल तिथे तुमच्या जिल्यातील नोंदणीकृत पत्ता आणि फोन नंबर सह हॉस्पिटलची यादी दिसेल

 

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नेटवर्क रुग्णालये

  • सर्व प्रथम https://www.jeevandayee.gov.in/ या संकेतस्थळावर जा
  • वेबसाइटच्या होम पेजवरून मेनू बारवर जा आणि Network Hospitals निवडा
  • स्क्रीनवर एक ड्रॉप-डाउन सूची उघडेल जिथून तुम्हाला “Network Hospitals” पर्याय निवडण्याची आवश्यकता आहे
  • महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य Network मध्ये असणारी रुग्णालयाची यादी जिल्हा, तालुका, हॉस्पिटलचे नाव, पत्ता, फोन नंबर, ई-मेल आय डी सह मिळेल

 

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Bed Occupancy Information: कोणत्या रुग्णालयामध्ये किती खाट Bed उपलब्ध आहेत ते पहा

  • सर्व प्रथम https://www.jeevandayee.gov.in/ या संकेतस्थळावर जा
  • पोर्टलच्या होम पेजवरून मेनूबारवर जा आणि Hospitals पर्याय निवडा
  • एक ड्रॉप-डाउन सूची उघडेल जिथून तुम्हाला Bed Occupancy पर्याय निवडायचा आहे
  • स्थान, रुग्णालय, श्रेणी, जिल्हा इ. सारख्या प्रगत शोधात तपशील प्रविष्ट करा.
  • Get Information बटन वर क्लिक करा तुम्हाला हवी असणारी माहिती स्क्रीनवर दिसेल

 

mahatma jyotiba phule jan arogya yojana महात्मा फुले जन आरोग्य योजना हॉस्पिटल लिस्ट ऑनलाईन कशी पहावी

महात्मा फुले जन आरोग्य योजना रुग्णालयाची यादी download करायची असेल तर पुढील लिंक वर क्लीक करा आणि रुग्णालयाची यादी डाउनलोड करा

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana Helpline Number महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना हेल्पलाइन क्रमांक

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने संबंधी काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून तुमचे प्रश्न विचारू शकता

टोल फ्री क्रमांक :
155 388
1800 233 2200


FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न

महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा उद्देश काय आहे?
महाराष्ट्रातील दारिद्र रेषेखालील आणि दारिद्र रेषेवरील कुटंबातील लोकांना निशुल्क आणि चांगल्या वैद्यकीय सेवा मिळाव्या या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने हि योजना लागू केली आहे.

Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana योजनेच्या नोंदणीची प्रक्रिया
योजनेंतर्गत पॅनेल केलेल्या आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये जाऊन आधार कार्ड, केशरी/ पिवळे शिधापत्रिका, पॅन कार्ड, फोटो असलेले ओळखपत्र इ. आवश्यक कागदपत्रासह अर्ज करून आपली नोंदणी करावी

महाराष्ट्र सरकारची मोफत आरोग्य विमा योजना काय आहे?
महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना हि महाराष्ट्र सरकारची मोफत आरोग्य विमा योजना आहे, या योजनेअंतर्गत सरकारी तसेच खाजगी रुग्णालयामध्ये सुद्धा निशुल्क सेवा प्रधान केली जाते

PMJAY साठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?
या योजनेंतर्गत पॅनेल केलेल्या सर्व रुग्णालयामध्ये या योजनेचे प्रतिनिधी, आरोग्यमित्र असतात जे तुम्हाला हेल्थ कार्ड मिळवून देण्यास मदत करतात, या रुग्णालयामध्ये जाऊन आवश्यक कागदपत्रासह अर्ज करावा

महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत रुग्णाला उपचारासाठी काही अतिरिक्त पैसे द्यावे लागतील का?
नाही. मंजूर पॅकेज अंतर्गत समाविष्ट असलेल्या सेवांसाठी रुग्णाने हॉस्पिटल/केंद्राला कोणतेही अतिरिक्त पैसे देऊ नयेत.

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणतीही महत्त्वाची बातमी कधीही चुकवू नका. आमची सदस्यता घ्या.

ताज्या बातम्या

केंद्र सरकार योजना

Related News