घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर आपसूकच आपल्या तोंडून येत ‘लक्ष्मी आली घरा’ म्हणजे मुलींमध्ये लक्ष्मीचा वास असतो; ती आपल्या बरोबर खूप साऱ्या आनंद आणि सुखाबरोबर लक्ष्मी ही घेऊन येते, अशी पूर्वी पासून समज आहे. परंतु आता हाच समज महाराष्ट्र सरकारने सत्यात उतरवला आहे ‘लेक लाडकी योजनेच्या’ Lek Ladki Yojana स्वरूपात. या योजनेचे स्वरूप काय असेल? त्याचा मुलींना काय फायदा होणार? हे सर्व आपण पुढे पाहूया.
आता काळ बदललेला आहे पूर्वी प्रमाणे विचार करणारे लोक समाजामध्ये खूप कमी आहेत. आताच्या पिढीची मानसिकता बदलली आहे; आज समाजामध्ये मुलीचे पालक होणं सौभाग्याचे मानले जाते. सुशिक्षित पालक आपल्या मुलींना चांगल्याप्रकारे शिक्षण,संस्कार, जीवन देत आहेत. मुलगा आणि मुलगी हा भेद तर केव्हाच मागे पडला आहे. आताच्या मुलीही खूप कर्तृवाण आहेत; प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. परंतु त्या फक्त शहरी भागातीलच आहेत, खेड्यांमधील मुली त्या मानाने खूप मागे आहेत, खेड्यातील मुलींनीही सक्षम व्हावे. आणि या सर्व गोष्टी तेव्हाच होतील जेव्हा मुली शिक्षण घेतील. स्वतःचा सर्वांगीण विकास करतील तेव्हाच जगाच्या स्पर्धात्मक युगात तग धरतील. आणि ज्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्या पालकांचा प्रश्नच नाही, पण ज्या पालकांची आर्थिक स्थिती हलाकीची आहे अशा पालकांच्या मुलींचे काय?
आर्थिक स्थिती हलाकीची असणाऱ्या कुटंबातील मुलींसाठी महाराष्ट्र सरकार घेऊन आली आहे ‘लेक लाडकी योजना’ महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यात आला; या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये “लेक लाडकी योजनेची” घोषणा केली गेली. मुलींचा जन्मदर वाढावा, समाजामधील स्त्री- भूण हत्या बंद व्हाव्यात, मुली शैक्षणिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजनेच्या स्वरूपात एक चांगले पाऊल उचललेले आहे. समाजातील सर्व स्थरातून या योजनेचे स्वागत केले जात आहे. आजचा समाज मुलींकडे आदराने, अभिमानाने पाहतो आहे. आणि या समाजाच्या बदललेल्या सकारात्मक मानसिकतेला महाराष्ट्र शासनाने “लेक लाडकी योजना” सुरु करून पाठबळ दिले आहे.
महागाईमुळे सामान्य परिवारातील लोकांचे आधीच कंबरडे मोडले आहे; त्यामुळे त्यांना आपल्या मुलींना शिक्षण देणे जोखमीचे झाले आहे. आणि आशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाने केलेली मदत हि स्वगताहयच आहे. या मदतीमुळे मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न मिटेल, आताचे शिक्षण खूप महाग झाले आहे त्यामुळे या योजनेमुळे आर्थिक स्तिथी बेताची असलेल्या पालकांना मदतच होईल. या योजनेचा फायदा जास्त करून खेडयापाडयात गरीब कुटुंबातील मुलींना जास्त होईल. आज आपणं बघतो खेड्यातील गरीब कुटुंबातील मुलींना पैस्या अभावी मनाविरुध्द शिक्षण अर्धवट सोडावे लागते. परंतु आता पैस्या अभावी शिक्षण अर्धवट सोडावे लागणार नाही, कारण आता गरीब मुलींना महाराष्ट्र सरकार मुलीचा जन्म झाल्या पासून ते मुलगी १८ वर्षाची होई पर्यंत तिला ५ टप्यांमध्ये ठराविक राशी देत आहे.
Lek Ladki Yojana 2024: लेक लाडकी योजना काय आहे?
महाराष्ट्राचे अर्थमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या योजनेची विस्तृत माहिती दिली. हा लाभ फक्त पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींनाच मिळणार आहे. या योजनेअतांतर्गत मिळणारे पैसे हे मुलीच्या बँक अकॉऊंट मध्ये ५ टप्प्यांमध्ये मिळणार आहेत. मुलीचा जन्म झाल्यानंतर, मुलगी शाळेमध्ये म्हणजे इयत्ता १ली मध्ये गेल्यानंतर, मग इयत्ता ६ वी मध्ये गेल्यानंतर, ११वी मध्ये गेल्यानंतर आणि मुलगी जेव्हा १८ वर्ष पूर्ण करेल तेव्हा. अशा पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून तिच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा केले जातील. महाराष्ट्र शासनाची हि योजना मुलीच्या वय वर्ष १८ पर्यंतच लागू राहील.
लेक लाडकी या योजनेमध्ये मिळणारे पैसे हे ५ टप्प्यांमध्ये विभागले गेले आहेत, हे पैसे मुलीच्या बँक अकाउंट मध्ये केव्हा आणि किती पैसे मिळतील ते आपण पाहूया.
पैसे मिळण्याचा कालावधी | किती पैसे मिळणार |
---|---|
मुलीचा जन्म झाल्यानंतर | ५,०००/- रुपये |
मुलगी शाळेत इयत्ता १ली मध्ये गेल्यानंतर | ४,०००/- रुपये |
मुलगी इयत्ता ६ वी मध्ये गेल्यानंतर | ६०००/- रुपये |
मुलगी इयत्ता ११ वी मध्ये गेल्यानंतर | ८०००/- रुपये |
मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर | ७५,०००/- रुपये |
या योजनेमागील सरकारचा उद्धेश
महाराष्ट्र सरकारचा हि योजना सुरु करण्याचा उद्देशच हा आहे कि समाजामध्ये मुलींना मान, सम्मान, प्रतिष्ठा मिळावी. समाजामधील स्त्रियांना समान हक्क मिळावा, स्त्रियांबद्दल समाजामध्ये ज्या वाईट चाली रीती आहेत त्या बंद व्हाव्यात. मग त्या स्त्रीभ्रूण हत्या असतील, मुलगा आणि मुलींमधील भेदभाव असेल. मुलीना समाजामध्ये प्रतिष्ठा निर्माण व्हावी. मुलगी हे परक्याचे धन आहे मग तिला का शिकवायचं? असा विचार करणारे लोक हि समाजामध्ये लोक आहेत अशा लोकांच्या विचारांमध्ये परिवर्तन व्हावे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकार ही योजना राबवत आहे.
मुलींना योग्य मार्गदर्शन आणि योग्य शिक्षण मिळालं तर मुली काय करू शकतात; हे आपण बघतच आहोत. आज मुली प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत, मुलींच्या यशाचा आणि पर्यायाने आपल्या देशाचा प्रगतीचा आलेख हा असाच वाढत जावो यासाठी सरकार अनेक योजना राबवत असते अशा मधील हि महाराष्ट्र शासनाची “लेक लाडकी योजना”
What are the benefits given to a girl child by the Maharashtra government? लेक लाडकी योजनेचे फायदे आणि वैशिष्ट्ये
- या योजनेमुळे आर्थिक स्थिती हलाकीच्या असणाऱ्या पालकांची मुलेही शिक्षण घेतील
- शिक्षण घेतल्याने मुली शैक्षणिक दृष्ट्या सक्षम होतील
- मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होईल
- मुलींना सरकार दरबारी प्रतिष्ठा मिळाल्याने समाजामध्ये सुद्धा प्रतिष्ठा मिळेल
- मुलगा, मुलगी मधील भेद कमी होईल
- स्त्री- भूण हत्या बंद होण्यास मदत होईल
Who is eligible for lek ladki yojana? लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?
- पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींनाच हा लाभ मिळणार आहे.
- मुलीचे पालक व मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक आहे.
- मुलीचा जन्म झाल्यानंतर अर्ज करणे आवश्यक आहे.
- मुलीचे कोणत्याही बँकेमध्ये अकाउंट असणे जरुरीचे आहे.
- या योजनेचा लाभ मुलीच्या वय वर्ष १८ पर्यंत मिळेल.
‘लेक लाडकी योजना’ हि महाराष्ट्रात अजून लागू झाली नाही आहे परंतु लवकरच महाराष्ट्र शासनाचा आद्यादेश काढला जाईल आणि हि योजना महाराष्ट्र राज्यात लागू केली जाईल. शासनाकडून अजून तपशील मिळाले नाहीत परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची गरज भासू शकते, अर्ज कुठे व कसा करावा ते आपण पाहूया.
Which document is required for lek ladki yojana? लेक लाडकी योजनेसाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे?
- संबंधित मुलीचा आणि मुलीच्या पालकांचा फोटो
- संबंधित मुलीचे आणि मुलीच्या पालकांचे आधार कार्ड
- मुलीच्या जन्माचे प्रमाणपत्र
- पिवळे किंवा नारंगी रेशन कार्ड
- संबंधित मुलीचे आणि मुलीच्या पालकांचे बँकेचे तपशील (बँक अकॉउंट नंबर, IFSC कोड ई.)
How to apply for the Maharashtra Lek Ladki Scheme? लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा
आधी सांगितल्याप्रमाणे ‘लेक लाडकी योजना’ हि महाराष्ट्रात अजून लागू झाली नाही आहे परंतु लवकरच महाराष्ट्र शासनाचा आद्यादेश काढला जाईल आणि हि योजना महाराष्ट्र राज्यात लागू केली जाईल. या योजनेचे सर्व तपशील अजून शासनाकडून आलेलं नाहीत परंतु महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनांचा विचार केला तर या योजनेची अर्ज करण्याची पद्धत सारखीच असेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी अर्ज मागवले जातील, हे अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. ऑनलाईन अर्ज मागवन्यासाठी एक संकेतस्थळ विकसित करण्यात येईल. ऑनलाईन द्वारे वरती दिल्या प्रमाणे संबंधित मुलीची आणि मुलीच्या पालकांची माहिती आणि आवश्यक कागदपत्र मागवले जातील आणि हि योजना लागू केली जाईल
तसेच ऑफलाईन द्वारे सुद्धा अर्ज मागवले जातील, संबंधित परिवाराच्या शेजारील सरकारी कार्यालयामधून फॉर्म दिला जाईल आणि तो फॉर्म भरून त्यासोबत सर्व कागदपत्रांची प्रत मागवून ती तपासून संबंधित मुलीला योजना लागू केली जाईल
समाजातील आर्थिक स्थिती हलाकीची असणारे पालक आपल्या मुलींना सर्वार्थी सक्षम बनवण्यासाठी, मुलीना समाजामध्ये मान मिळवण्यासाठी, तिच्या शिक्षणासाठी झटत आहे; त्यांच्या या कार्यामध्ये त्यांच्या बरोबरीने महाराष्ट्र सरकार हि चालत आहे हेच ‘लेक लाडकी योजने’ द्वारे सरकारने सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्य विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यात आला; या अर्थसंकल्पामध्ये “लेक लाडकी योजनेची”घोषणा केली गेली आणि आणि सरकारकडून सांगण्यात आले कि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि आपल्या मुलींना सर्वार्थी सक्षम बनवावे.
FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न
लेक लड़की योजना काय आहे?
मुलीचा जन्म झाल्यानंतर मुलगी १८ वर्षाची होई पर्यंत टप्प्याने महाराष्ट्र सरकारकडून मुलीच्या बँक अकाउंट वर पैसे जमा केले जातात
किती पैसे मिळतील?
मुलीचे १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत रु. ९८ हजार मिळतील