Annasaheb Patil Loan 2024 | मराठा तरुणांना व्यावसायासाठी बीनव्याजी कर्ज

Annasaheb Patil Loan

महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकाचा विकास करण्यासाठी Annasaheb Patil Loan अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली. या विकास महामंडळाकडून मराठा समाजातील तरुणांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी रु. १५ लाख ते रु. ५० लाख पर्यंतच्या कर्जावरील व्याज परतावा दिला जातो.

Table of Contents hide

What is the Maratha loan scheme in Maharashtra अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ

महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने २७ नोव्हेंबर १९९८ रोजी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना केली, मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास बेरोजगार तरुणांना रोजगार व स्वंयरोजगाराच्या वेगवेगळ्या संधी सह वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देण्याचे काम महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत करून दिले आहे. बेरोजगार तरुणांचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता वाढवणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्व ३६ जिल्यामधील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांची अंमलबजावणी होत असते. या योजनेअंतर्गत इच्छुक व बेरोजगार मराठा उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन, व आर्थिक सहाय्य करण्यात येत असते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित ही महाराष्ट्र शासनाची एक वित्तीय संस्था आहे, या संस्थेची स्थापना मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी केलेली आहे. या योजनेचा कारभार हा पारदर्शक केला जातो, हि योजना माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गात येते.

Credit Scheme for all Co-op Bank Loans सर्व सहकारी बँकेच्या कर्जासाठी पतहमी योजना

महाराष्ट्र राज्यातील होतकरू मराठा तरुणांना आपला व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेतून कर्ज मिळवण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. म्हणून छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता अभियानाअंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने १५/१०/२०१८ च्या ठरावानुसार CGTMSE योजनेअंतर्गत समाविष्ट नसलेल्या सहकारी बँकांच्या आशा सूक्ष्म व लघु व्यवसाय कर्जांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत पत हमी योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Annasaheb Patil Loan Eligibility: अण्णासाहेब पाटील कर्ज पात्रता

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत तीन प्रकारांमध्ये हि योजना राबविली जाते.

  1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
  2. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
  3. गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)

Annasaheb Patil Loan वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) : स्वतःचा व्यवसाय चालू करण्यासाठी ज्यांनी कोणी वैयक्तिक कर्ज घेतले असेल तर ते वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत येते. तसेच या कर्जाचा कालावधी हा कर्ज उचलल्यापासून ५ वर्ष किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल तो कालावधी लागू असेल. परंतु या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने महाराष्ट्रातील CBS प्रणालीयुक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत कर्जाची मर्यादा आधी १० लाख होते परंतु दिनांक २० मे २०२२ पासून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I) मर्यादा १५ लाख करण्यात आली आहे, तर कालावधी जास्तीत जास्त ५ वर्ष व व्याज दर द.सा.द.शे १२% असेल तसेच जास्तीत जास्त ३ लाखापर्यंत कर्ज व्याज परतावा मिळेल. या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी ४% निधी राखून ठेवण्यात आला आहे.

Annasaheb Patil Loan वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना लाभार्थी पात्रता :

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे
  • लाभार्थी मराठा किंवा महामंडळ नसणाऱ्या समाजाचा असावा
  • उमेदवाराचे वय पुरुष जास्तीत-जास्त ५० तर महिला जास्तीत जास्त ५५ वर्षे असेल
  • अर्जदाराने महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेब पोर्टलवर www.mahaswayam.in नोंदणी करावी
  • उमेदवाराचे कौंटूबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
  • लाभार्थ्याने याआधी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल
  • लाभार्थी दिव्यांग असेल तर त्याचे दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे

Annasaheb Patil Loan गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) : या योजने अंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी. कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट व संस्था लाभास पात्र असतील. तसेच या कर्जाचा कालावधी हा कर्ज उचलल्यापासून ५ वर्ष किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा जे कमी असेल तो कालावधी लागू असेल.

या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांने महाराष्ट्रातील CBS प्रणालीयुक्त बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. गट कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत कर्जाची मर्यादा रु. ५० लाख आहे, तर कालावधी जास्तीत जास्त ५ वर्ष व व्याज दर द.सा.द.शे १२% असेल. या योजनेअंतर्गत दिव्यांगांसाठी ४% निधी राखून ठेवण्यात आला आहे, परंतु दिव्यांग मानसिक दृष्टया सक्षम असावेत व गट प्रकल्पातील सर्व लाभार्थी दिव्यांग असावेत.

व्यवसायासाठी २० लाखापर्यंत कर्ज संपूर्ण माहिती___

annasaheb patil loan scheme information in marathi गट कर्ज व्याज परतावा योजना लाभार्थी पात्रता :

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे
  • लाभार्थी मराठा किंवा महामंडळ नसणाऱ्या समाजाचा असावा
  • लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असावे
  • उमेदवाराचे वय पुरुष जास्तीत-जास्त ५० तर महिला जास्तीत जास्त ५५ वर्षे असेल परंतु कृषी व पारंपारीक व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटाकरीता या योजनेअंतर्गत असलेली कमाल वयाची अट वगळण्यात आली आहे
  • महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेब पोर्टलवर www.mahaswayam.in नोंदणी करावी
  • कौंटूबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे
  • लाभार्थी गटाने याआधी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • लाभार्थी गटाची इतर कोणत्याही बँक/ वित्तीय संस्थेची थकबाकी नसावी
  • एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल
  • लाभार्थी दिव्यांग असेल तर त्याचे दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे

Annasaheb Patil Loan गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I): गट प्रकल्प योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या गटातील आशा प्रतिनिधीनेच महामंडळाशी व्यवहार करणे अपेक्षित आहे की ज्या सदस्याची www.udyog.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी झालेली आहे, व त्याचे अधिकार असल्याची पत्राची प्रत, महामंडळास ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

आवश्यकतेनुसार जर नोंदणीकृत अधिकारी बदलावयाचा असेल तर गटाने आवश्यक ठरावाची प्रत ऑनलाईन अपलोड करावी त्याकरीता रु. ५००/- शुल्क आकारण्यात येईल. गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत कर्जाची मर्यादा रु. ५० लाख आहे, तर कालावधी जास्तीत जास्त ५ वर्ष व व्याज दर द.सा.द.शे १२% असेल.

गट प्रकल्प कर्ज योजना लाभार्थी पात्रता :

  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे
  • लाभार्थ्यांमध्ये मराठा किंवा महामंडळ नसणाऱ्या समाजातील सदस्यांची संख्या ६०% असणे अनिवार्य आहे
  • लाभार्थ्याचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असावे
  • लाभार्थी अर्जदार वयोमर्यादा १८ पेक्षा अधिक असावी
  • महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेब पोर्टलवर www.mahaswayam.in नोंदणी करून अर्ज करणे अनिवार्य आहे
  • कौंटूबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  • लाभार्थ्याने याआधी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा
  • लाभार्थी गटाची इतर कोणत्याही बँक/ वित्तीय संस्थेची थकबाकी नसावी.
  • एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल
  • लाभार्थी दिव्यांग असेल तर त्याचे दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे

स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना सुलभ व जलद कर्ज उपलब्ध करुन देण्याकरीता स्वयंरोजगार वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे, प्रत्येक उमेदवार आणि गट कर्ज मिळण्याबाबतचा अर्ज करण्यापासून ते कर्ज पात्र प्रमाणपत्र आणि शासनाचे कर्ज हमी पत्र मिळण्यापर्यंत सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने करू शकतात, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे.

Annasaheb Patil Loan Bank List अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सोबत MOU केल्या असलेल्या बँकांची यादी

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सोबत MOU केल्या असलेल्या बँकांची यादी Annasaheb Patil Loan Bank List खाली दिलेली आहे, या बँकेत जाऊन मराठा उमेदवार कर्ज मिळवण्यासाठी आपला अर्ज दाखल करू शकतो.

Annasaheb Patil Loan Application Form ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत :

  • सर्वप्रथम उमेदवाराने/गटातील अर्जकर्त्याने स्वत:ची www.mahaswayam.in या संकेत स्थळावर आधार लिंक मोबाइलवरील OTP द्वारे नोंदणी करणे अनिवार्य असेल
  • नोंदणी झाल्यानंतर उमेदवाराने/गटाने कर्ज व्याज परताव्याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरून पाठवायचा आहे
  • अर्ज पाठवल्यानंतर शासकीय सुट्ट्या वगळून सात दिवसाच्या आत उमेदवार पात्र आहे किंवा नाही किंवा अर्जामध्ये काही त्रुटी असतील तर महामंडळामार्फत कळविण्यात येईल
  • उमेदवार/गटातील अर्जकर्त्याने पात्र असेल तर संबंधित उमेदवाराला पात्रता प्रमाणपत्र (LOI) त्याचबरोबर कर्ज हमी संबंधीचे शासनाचे पत्र ऑनलाईन प्राप्त होईल
  • अर्जकर्त्याने/ गटातील अर्जकर्त्याने सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे शपथपत्र ऑनलाईन भरायचे आहे

Annasaheb Patil Loan Documents List ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • रहिवाशी पुरावा (लाईट/टेलीफोन बिल, रेशन कार्ड प्रत, पासपोर्ट प्रत, भाडे करार प्रत इ.)
  • उत्पनाचा पुरावा (ITR प्रत किंवा लाहसीलदार प्रमाणपत्र)
  • लाभार्थ्याने/गटाने व्यवसाय सुरु केलेल्या सहा महिन्यातील व्यवसायांचे २ फोटो
  • जातीचा दाखला

Annasaheb Patil Mahamandal Contact Number: अण्णासाहेब पाटील कर्ज योजना contact number

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. मुंबई ऑफिस
जी.टी. हॉस्पिटल कंपाऊंड, बदरुद्दीन तय्यबजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.एम.टी स्टेशन जवळ.मुंबई-४००००१
दूरध्वनी क्र. ०२२ २२६५७६६२ / ०२२ २२६५८०१७
ईमेल: dir.apam@maharashtra.gov.in

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. मुंबई ऑफिस
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी,
पहिला मजला, एल्फिस्टन टेक्निकल हायस्कूल परिसर,
३, महापालिका मार्ग, धोबी तलाव.मुंबई-४००००१
ईमेल: helpdesk@mssds.in

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित. नवी मुंबई ऑफिस
कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम आयुक्तालय,
तिसरा मजला, कोकणभवन (संलग्नक),
सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई ४०० ०६१४
दूरध्वनी क्र. ०२२-२७५७१९४२ / ०२२ २७५७१९४४
ईमेल: support@ese.maharashtra.gov.in

टोल फ्री क्रमांक :
1800-120-8040


FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न

What is the income limit for Annasaheb Patil loan? अण्णासाहेब पाटील कर्जाची उत्पन्न मर्यादा किती आहे?
उमेदवाराचे कौंटूबिक वार्षिक उत्पन्न रु. ८ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

What is the maximum Loan Limit amount of Annasaheb Patil loan? अण्णासाहेब पाटील कर्जाची कमाल रक्कम किती आहे?
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा मार्फत मराठा समाजातील तरुणांना वैयक्तिक कर्ज १० लाख आणि गट कर्ज ५० लाखापर्यंत मिळते

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना व्याज परतावा किती?
अण्णासाहेब पाटील महामंडळअंतर्गत १० ते ५० लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते व त्या कर्जाच्या १२% पर्यंतच्या व्याजाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ कोणासाठी आहे?
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेचा लाभ फक्त मराठा समाजातील तरुण आणि तरुणींना दिला जातो. ज्या उमेदवाराच्या दाखल्यावरती मराठा असा उल्लेख आहे तेच या कर्जा साठी पात्र राहतील.

महाराष्ट्रात मराठा जात obc आहे का?
महाराष्ट्रात मराठा जात obc मध्ये येत नाही परंतु मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा obc मध्ये येतात

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणतीही महत्त्वाची बातमी कधीही चुकवू नका. आमची सदस्यता घ्या.

ताज्या बातम्या

केंद्र सरकार योजना

Related News