Agricultural Transport Subsidy Scheme 2024 कृषी माल आंतरराज्यीय व्यापार रस्ते वाहतूक सबसिडी योजना

Agricultural Transport Subsidy Scheme

महाराष्ट्र राज्यातून भाजीपाला व फळांचा होणाऱ्या आंतरराज्यीय व्यापारास चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत रस्ते वाहतूक अनुदान योजना Agricultural Transport Subsidy Scheme राबविण्यात येते त्याबद्दल पूर्ण माहिती आपण पाहूया.

महाराष्ट्र राज्य भाजीपाला आणि फळे उत्पादनामध्ये अग्रेसर आहे, टोमॅटो, डाळींब, द्राक्षे, केळी, कांदा, आंबा त्याच बरोबर भाजीपाल्याचे महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. निर्यात व्यापारासह देशांतर्गत बाजारपेठेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील भाजीपाला आणि फळे यांना मागणी आहे म्हणून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र राज्यातील फळे व भाजीपाला परराज्यातील बाजारपेठेत पाठवली जातात.

फळे व भाजीपाला हे नाशवंत असल्याने लवकरात लवकर बाजारपेठेत पोहोचवणे आती महत्वाचे असते त्याच बरोबर अनेक वेळा वाहतूकीला लागणाऱ्या वेळामुळे आणि अयोग्य हाताळणीमुळे २० ते ३०% कृषी मालाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी उत्पादक कंपन्यां आणि शेतमाल उत्पादक शेतकरी सहकारी संस्थाना कृषी माल इतर राज्यातील बाजारपेठेत घेऊन जाणे परवडत नाही, तसेच त्यांच्यावर भाजीपाला व फळे इतर राज्यात पाठवण्याच्या मर्यादा येतात आणि म्हणून महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने कृषी मालाचा आंतरराज्यीय व्यापार अखंडित व सुलभ करण्यासाठी तसेच या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी वाहतूक खर्चात अनुदान देण्यात येते.

What is the transport subsidy? रस्ते वाहतूक अनुदान म्हणजे नक्की काय

प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासात औदयोगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असते आणि याला भारत देशही अपवाद नाही. अनेकदा निर्यात व्यापाराबरोबर राज्याच्या सीमा ओलांडून कृषी मालाचा आंतरराज्यीय व्यापार करणे गरजेचा असतो परंतु अनेकदा आंतरराज्यीय व्यापार करते वेळी वाहतुकीबद्दलचे अडथळे येतात. म्हणून आंतरराज्यीय व्यापार सुरळीत करण्यासाठी तसेच शेतकरी आणि व्यापाऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रस्ते वाहतूक अनुदान योजना सुरू केली.

रस्ते वाहतूक अनुदान हा एक सरकारी उपक्रम आहे आणि हि योजना महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राबवण्यात येते. कृषी मालाचा आंतरराज्यीय व्यापार अखंडित व सुलभ करण्यासाठी तसेच या व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी हि योजना तयार करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत रस्ते वाहतुकीवर सबसिडी दिल्याने आंतरराज्यीय व्यापारात गुंतलेल्या शेतकरी सहकारी संस्था आणि व्यापाऱ्यांना वाहतुकीबद्दलच्या भेडसावणाऱ्या समस्या दूर होतील तसेच वाहतुकीचा होणारा एकूण खर्चही कमी होईल.

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत रस्ते वाहतूक अनुदान योजने अंतर्गत देण्यात येणारे रस्ते वाहतूक अनुदानाचा कालावधी ३१ मार्च २०२६ पर्यंतचा आहे. परंतु या अनुदानाच्या काही अटी व शर्ती आहेत, त्या अटी व शर्ती कोणत्या आहेत ते आपण पाहूया.

  • हि योजना केवळ महाराष्ट्र राज्यातून कृषी माल रस्ते वाहतूकीद्वारे इतर राज्यातील बाजारपेठेत घेऊन जाऊन प्रत्यक्ष विक्री करण्यात येणा-या व्यवहारासाठीच लागू राहील
  • योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी माल उत्पादकांच्या सहकारी संस्था पात्र असतील
  • या योजनेमध्ये विक्री करण्यास पाठवण्यात येणारा शेतीमाल हा नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्थांच्या सभासदांनी स्वत: उत्पादित केलेला असणे आवश्यक आहे
  • या योजनेअंतर्गत काम सुरु करणाऱ्या संस्थांनी पणन मंडळाची पुर्वमान्यता घेणे आवश्यक आहे
  • सदर योजना नाशवंत पिकांसाठीच लागू आहे या योजनेत आंबा, द्राक्षे, केळी, डाळींब, संत्रा, मोसंबी, कांदा, टोमॅटो, आले व भाजीपाला या फळांचा समावेश आहे, या फळांन व भाजीपाल्या व्यतिरिक्त नाशवंत कृषी माल परराज्यात विक्री करावयाचा झाल्यास पणन मंडळाची पुर्वमान्यता घेणेआवश्यक राहील
  • सदर योजने अंतर्गत मिळणारे अनुदान हे फक्त शेतमालाचे रस्तेमार्गे होणा-या वाहतूक खर्चावरच राहील यामध्ये बाकीच्या कोणत्याही खर्चाचा समावेश नसेल तसेच हे अनुदान शेतमालाची विक्री झालेनंतरच मिळेल

या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष वाहतूक केलेल्या अंतरानुसार अनुदान देय काय असेल ते खाली दिलेल्या तक्त्यामध्ये सविस्तरमध्ये दिले आहे ते आपण पुढे पाहूया

बाजारपेठेचे अंतर मिळणारे अनुदान
कमीत कमी ३५० ते जास्तीत जास्त ७५० कि. मी. पर्यंतचे अंतर असल्यास रस्ते वाहतूकेला लागलेल्या खर्चाच्या ५०% अथवा कमाल मर्यादा रु. २०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.
कमीत कमी ७५१ ते जास्तीत जास्त १००० कि. मी. पर्यंतचे अंतर असल्यास रस्ते वाहतूकेला लागलेल्या खर्चाच्या ५०% अथवा कमाल मर्यादा रु. ३०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.
कमीत कमी १००१ ते जास्तीत जास्त १५०० कि. मी. पर्यंतचे अंतर असल्यास रस्ते वाहतूकेला लागलेल्या खर्चाच्या ५०% अथवा कमाल मर्यादा रु. ४०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.
कमीत कमी १५०१ ते जास्तीत जास्त २००० कि. मी. पर्यंतचे अंतर असल्यास रस्ते वाहतूकेला लागलेल्या खर्चाच्या ५०% अथवा कमाल मर्यादा रु. ५०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.
कमीत कमी २००१ किंवा त्यापेक्षा अंतर असल्यास रस्ते वाहतूकेला लागलेल्या खर्चाच्या ५०% अथवा कमाल मर्यादा रु. ६०,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.
अरूणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, आसाम, नागालँड, मणिपूर, मेघालय व त्रिपुरा या राज्यासाठी रस्ते वाहतूकेला लागलेल्या खर्चाच्या ५०% अथवा कमाल मर्यादा रु. ७५,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम.

Objectives of Agricultural Transport Subsidy Scheme रस्ते वाहतूक अनुदान योजनेची उद्दिष्टे

  • आंतरराज्यीय व्यापार सुलभ करणे: या योजनेचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे आंतरराज्य व्यापारातील येणारे अडथळे दूर करणे होय, ज्यामुळे शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था व व्यापाऱ्यांना त्यांच्या राज्याच्या सीमेपलीकडे (इतर राज्यात) मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश मिळू शकेल. या योजनेमुळे संसाधनांचे वाटप अधिक कार्यक्षमपणे करण्यास प्रोत्साहन देते तसेच कृषी क्षेत्राच्या वाढीस प्रोत्साहन देते.
  • खर्चात होणारी कपात: महाराष्ट्र राज्य सरकारने रस्ते वाहतूक अनुदान योजनेअंतर्गत अनुदान देऊन आपल्या राज्यातील कृषी माल इतर राज्यातील बाजारपेठेत घेऊन जाणाऱ्या संबंधित शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था व व्यापाऱ्यांचा वाहतूक खर्च कामे करणे हा आहे. या खर्च कपातीमुळे त्यांचे उत्पादन दूरच्या बाजारपेठांमध्ये अधिक स्पर्धात्मक होते.
  • Market Access बाजारपेठेतील प्रवेश: या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे शेतकरी सहकारी संस्था किंवा व्यापाऱ्यांना विविध राज्यांमधील बाजारपेठ व ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सक्षम करून देऊन त्यांचा बाजारपेठेतील थेट प्रवेश वाढवणे हे आहे. यामुळे केवळ ग्राहकांची संख्याच वाढत नाही तर प्रादेशिक बाजारपेठेतील मागण्यांवर आधारावर पिक घेण्यास शेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळते.

Impact of Road Transport Subsidy Scheme in Maharashtra रस्ते वाहतूक अनुदान योजनेचा प्रभाव:

  • आर्थिक सक्षमीकरण: या योजनेमुळे आंतरराज्यीय व्यापारात गुंतलेल्या शेतकरी, शेतकरी सहकारी संस्था आणि व्यापाऱ्यांरी वाहतूक खर्च कमी करून, ते त्यांच्या नफ्याचे प्रमाण वाढवताणा दिसत आहेत आणि यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर सकारात्मक परिणाम होतो आहे
  • बाजारपेठेतील वैविध्य: रस्ते वाहतूक अनुदान योजनेमुळे शेतकरी आता आपल्या कृषी मालासाठी राज्याच्या सीमेपलीकडे बाजारपेठ शोधण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे बाजारपेठेतील वैविध्यता येते. यामुळे फक्त वैयक्तिक शेतकर्यांनाच याचा फायदा होत नाही तर संपूर्ण कृषी क्षेत्राच्या एकूण लवचिकतेलाही हातभार लागतो
  • पायाभूत सुविधांचा विकास: या योजनेमुळे देश्यांतर्गत कृषी मालाचे दळणवळण वाढल्याने वाहतूक क्षेत्रामधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहेत. म्हणून ही योजना अप्रत्यक्षपणे रस्ते आणि लॉजिस्टिक सुविधांच्या विकासाला हातभार लावते, ज्याचा फायदा शेती क्षेत्राबरोबरच त्यात समाविष्ट असलेल्या प्रदेशांच्या एकूण पायाभूत सुविधांनाही होतो.

Challenges and future perspectives of Agricultural Transport Subsidy Scheme : रस्ते वाहतूक अनुदान योजनेची आव्हाने आणि भविष्यातील दृष्टीकोन

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या रस्ते वाहतूक अनुदान योजनेने सकारात्मक बदल घडून आल्याचे दिसले तरी काही आव्हानांना सामोरे जाण्याची गरज आहे. यामध्ये योजनेचे न्याय्य वितरण सुनिश्चित करणे, काही अंशी होणारा गैरवापर रोखणे आणि बाजारातील गतिशीलतेशी जुळवून घेणे यांचा समावेश आहे. या योजनेची परिणामकारकता वाढवण्यासाठी सरकारने भागधारकांना गुंतवून ठेवणे, अभिप्राय गोळा करणे आणि आवश्यक समायोजन करणे सुरू ठेवले पाहिजे.

आंतरराज्यीय कृषीमाल व्यापार रस्ते वाहतूक अनुदान योजना हा एक स्तुत्य उपक्रम आहे ज्याचा उद्देश कृषी मालाचा आंतरराज्यीय व्यापार अखंडितपणे व सुलभ रीतीने चालावा तसेच या व्यापाराला प्रोत्साहन मिळावे हा आहे. आंतरराज्यीय व्यापारातील आव्हानांना तोंड देऊन, ही योजना कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण वाढीसाठी आणि शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक कल्याणासाठी योगदान महत्वाची ठरते. भारताने कृषी सुधारणांवर सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे, अशा योजना देशाच्या कृषी सामर्थ्याची पूर्ण क्षमता साकारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

शिवाय, रस्ते वाहतूक अनुदान सारख्या योजनामुळे भारताच्या कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येऊ शकतो, स्पर्धात्मक युगात जागतिक पातळीवर टिकाव लागण्यासाठी कृषी क्षेत्रात ज्या काही सुधारणा होण्याची गरज आहे त्या सुधारणा होण्यास मदत होईल.

या योजनेचे यश केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयावर अवलंबून आहे. केंद्र आणि राज्यांमधील धोरणे आणि कार्यपद्धती एकसमान केल्याने त्याच्यात एकवाक्यता येईल आणि त्यामुळे योजनेचे फायदे समान रीतीने वितरित करता येतील.

रस्ते वाहतूक अनुदान योजना ही कृषी उदोगाच्या उन्नतीसाठी आणि पर्यायाने राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी महत्वाच्या आहेत. आंतरराज्यीय व्यापाराशी निगडित आव्हानांना तोंड देऊन, ही योजना केवळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देत नाही तर भारतीय कृषी क्षेत्राची एकूण लवचिकता आणि स्पर्धात्मकता मजबूत करते. ही योजना भारताच्या शेतीला आधुनिक, कार्यक्षम आणि जागतिक पातळीवरील स्पर्धात्मक शक्तीमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने भविष्यातील उपक्रमांसाठी ब्लू प्रिंट म्हणून काम करू शकते.


FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न

रस्ते वाहतूक अनुदान योजना कोणा मार्फत चालवली जाते?
रस्ते वाहतूक अनुदान योजना महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत राबवण्यात येते.

रस्ते वाहतूक अनुदान योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेस नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी माल उत्पादकांच्या सहकारी संस्था पात्र आहेत.

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणतीही महत्त्वाची बातमी कधीही चुकवू नका. आमची सदस्यता घ्या.

ताज्या बातम्या

केंद्र सरकार योजना

Related News