How to get 7/12 – ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा

How to get 7/12

७/१२ उतारा हे शेतकऱ्यांच्या शेतीचे महत्वाचे कागदपत्र आहे, ७/१२ उतारा म्हणजे नक्की काय? या उताऱ्याचा वापर काय होतो? हे आपण कुटून मिळवाल? याबद्दलची सर्व माहिती पुढे पाहूया How to get 7/12.

What is sat bara? | ७/१२ उतारा म्हणजे काय?

७/१२ उतारा म्हणजे हा एक जमिनीचा माहिती दस्तऐवज आहे; ७/१२ उताऱ्या मुळे जमिनीची संपूर्ण माहिती मिळते. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९७१ यातील नियम ३,५,६ आणि ७  अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात. गावाचे नाव, तालुका, जिल्हा,, जमीन नोंदणी क्रमांक (ULPIN), गट क्रमांक, भोगवटदाराचे नाव, जमिनेचे क्षेत्र, आकार, लागवडीसाठी योग्य आणि लागवडीसाठी अयोग्य असलेली जमीन, त्या जमिनीवर काही कर्ज आहे कि नाही हि सर्व माहिती आपल्याला ७/१२ चा उतारा वाचून मिळते. ७/१२ मध्ये जमिनीचा फेरफार क्रमांक दिलेला असतो, आधीचा फेरफार प्रलंबित आहे कि नाही त्याशिवाय शेवटचा फेरफार क्रमांक तारखेसह दिला जातो, अशी सर्व माहिती ७/१२ मध्ये दर्शविलेले असते.

७/१२ मध्ये इतर अधिकार मध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या असतात  त्या नुसारच अंमलबजावणी करणे आवश्यक असते उदा. कुळकायदा कलम ४३ बंधनास पात्र असेल तर ती जमीन विकताना जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते आणि कलम ८४ बंधनास पात्र असेल तर ती जमीन फक्त आणि फक्त शेतकऱ्यालाच विकावी लागते.

तसेच गाव नमुना बारा (पिकांची नोंदवही) मध्ये पिकाची संपूर्ण माहिती दिली जाते. म्हणजे संबंधित जमिनीमध्ये कोणत्या वर्षी कोणत्या हंगामामध्ये कोणत्या प्रकारचे आणि कोणते पीक घेतले हि सर्व माहिती गाव नमुना बारा मध्ये मिळते.

What is the difference between 7 12 | ७ आणि १२ हा अर्क दोन रूपांचा मिलाफ आहे

  • फॉर्म 7 यामध्ये जमीन मालकांचे तपशील आणि त्यांच्या हक्कांबद्दल सांगितले आहे. म्हणजे भोगवटदाराचे वर्ग, नाव, क्षेत्र, आकार ई.
  • फॉर्म 12 यामध्ये जमिनीचा प्रकार आणि वापराबद्दल सांगितले आहे. म्हणजे जमीन लागवडीसाठी योग्य आहे कि अयोग्य ई.

 
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना लागू केल्या जातात; आणि या योजनांचा लाभ घेण्यासाठी, शेतीविषयक कर्ज हवे असेल तर शेतकऱ्यांना जी आवश्यक कागदपत्रे लागतात त्यामधील “७/१२ उतारा” हे सर्वात महत्वाचे कागद पत्र आहे. आताच्या कॉम्पुटर युगात तर कोणीही आणि कुठेही बसून आपला ७/१२ मिळवू शकतो. आणि ७/१२ वाचून जमिनीची संपूर्ण माहिती मिळवू शकतो.

What is Ferfar? How to check ferfar in 7/12? | जमिनीचा फेरफार म्हणजे काय?

७/१२ मध्ये जमिनीचा फेरफार क्रमांक दिलेला असतो, हा फेरफार क्रमांक म्हणजे काय आपण पाहूया

जमनीचा जेव्हा व्यवहार होतो म्हणजे जमिनीची विक्री करणारा आणि जमीन खरेदी करणारा; नवीन व्यवहारानुसार जमीन खरेदी करणारा हा जमिनीचा नवीन मालक असतो आणि जमिनीची विक्री करणारा हा जमिनीचा आधीचा मालक असतो हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर जुन्या मालकाचे नाव कंसामध्ये दिले जाते (कंसामध्ये नाव असलेला व्यक्ती आता त्या जमिनीचा मालक नसतो) आणि नवीन मालकाचे नाव त्याच्या खाली दिले जाते त्या शेजारी एक क्रमांक दिला जातो याला फेरफार असे म्हणतात.

गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना” सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

What are the benefits of 7 12? | 7/12 उतारा फायदे

७/१२ उतारा हे शेतकऱ्यांच्या शेतीचे कागदपत्रांमधील सर्वात महत्वाच्या कागदपत्र आहे.

  • ऑनलाईन ७/१२ उतारा पाहून तुम्हाला जमिनीची पूर्ण माहिती कळते.
  • जमिनीची मालकी हक्क कोणाची आहे, हे ७/१२ उतारामुळे कळते.
  • शेतकऱ्यांना शेतीविषयी कर्ज हवे असेल तर बँकेत ७/१२ उतारा प्रत देणे आवश्यक आहे.
  • जमिनीचा विक्री किंवा खरेदी व्यवहार करतेवेळी सुद्धा ७/१२ उतारा असणे आवश्यक असते.

How to check Satbara online? | ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा

महाराष्ट्र शासन आणि महसूल विभागाचं अधिकृत संकेतस्थळ bhulekh.mahabhumi.gov.in वरून शेतकरी आपला ७/१२ नावाने शोधू शकतो आणि फक्त नावानेच नाही तर सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव किंवा संपूर्ण नावाने शेतकरी आपला ७/१२ शोधू शकतात. या संकेतस्थळावर विना स्वाक्षरीत ७/१२, ८अ व मालमत्ता पत्रक फक्त पाहू शकतो पण ते पत्रक डाउनलोड नाही करू शकत.

७/१२ नावाने शोधण्याची जी प्रक्रिया आहे ती आपण टप्प्याटप्प्याने पाहूया

  • सर्व प्रथम bhulekh.mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर जा
  • संकेत स्थळाचे मुखपृष्ठ उघडल्या नंतर उजव्या बाजूच्या वर “Digitally Signed 7/12” असा एक लोगो दिसेल, तिथेच खाली ‘विभाग निवडा / Select Division’ इथे क्लिक करून आपला विभाग निवडा. त्या Dropdown मध्ये ६ विभाग दिले आहेत ‘अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे’ यामधील आपला विभाग निवडा आणि GO या बटन वर क्लिक करा.
  • नवीन window उघडेल तिथे आपल्या विभागाचे नावाबरोबर ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक असे तीन पर्याय दिसतील
  • तिथे ७/१२ च्या पुढे टिक करून किंवा (आपल्याला हवा असलेला पर्याय निवडून) आपला जिल्हा निवडावा
  • जिल्हा निवडल्यानंतर खाली तालुक्याचा पर्याय दिसेल तिथे आपला तालुका निवडावा
  • तालुका निवडल्यानंतर खाली तालुक्यात असणाऱ्या सर्व गावांची यादी दिसेल त्यामध्ये आपल्या गावाचे नाव शोधून त्या नावावर क्लिक करावे
  • गावाचे नाव निवल्यानंतर आपल्याला खाली ६ पर्याय दिसतील, ज्या पर्यायांच्या साहाय्याने तुम्हाला तुमचा ७/१२ शोधायचा आहे त्या पर्यायाने तुम्ही म्हणजे शेतकरी शोधू शकतात. म्हणजे शेतकरी आपला सर्वे नंबर टाकून, किंवा गट नंबर टाकून, किंवा पहिले नाव, मधील नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव टाकून ७/१२ शोधू शकतात
  • उदा. आपले संपूर्ण नाव टाकून ‘शोध’ या बटनावर क्लिक करा, मग खाली एक Dropdown दिसेल जिथे तुम्हाला तुम्हाला गावातील सर्वांच्या नावाची यादी दिसेल त्या यादी मध्ये तुम्हाला हवे असणारे नाव हि मिळेल
  • त्या नावावर क्लिक करा आणि खाली आपला मोबाईल नंबर टाका आणि पुन्हा ‘७/१२ शोधा’ या बटनावर क्लिक करा
  • नवीन विंडो उघडेल आणि तुम्हाला कॅप्चा कोड दिसेल तो type करा, आणि शेवटी खाली असलेले ‘Verify Captcha to view 7/12’ बटन क्लिक करा.
  • नवीन विंडो उघडेल आणि तुम्हाला तिथे तुमचा ७/१२ दिसेल

अश्या रीतीने प्रत्येक शेतकरी आपला ७/१२ महाराष्ट्र शासन आणि महसूल विभागाचं अधिकृत संकेतस्थळ bhulekh.mahabhumi.gov.in वर जाऊन पाहू शकतो

How to get 7/12 | 7/12 उतारा कसा (Download) काढावा?

महाराष्ट्र शासन आणि महसूल विभागाचं अधिकृत संकेतस्थळ bhulekh.mahabhumi.gov.in वरून आपण ७/१२ पाहून शकतो परंतु आपल्याला ७/१२ ची प्रत आपल्याकडे हवी असल्यास ती डाउनलोड करावी लागते आणि ती डाउनलोड करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाइट digitalsatbara.mahabhumi.gov.in वरून सशुल्क रुपयं १५/- (पंधरा रुपय फक्त) ऑनलाईन भरून 7/12 उतारा डिजिटल स्वाक्षरीसह डाउनलोड करू शकतो, डाउनलोड करून मिळणारी प्रत हि डिजिटल स्वाक्षरी सह मिळते त्यामुळे या मिळणाऱ्या उताऱ्यावर वेगळा शिक्का किंवा वेगळी स्वाक्षरी घेण्याची गरज नसते, डिजिटल स्वाक्षरी सह मिळणारे कोणतेही कागदपत्र हे कायदेशीर मानले जाते. ७/१२ ची डिजिटल स्वाक्षरी सह मिळणारी प्रत कशी डाउनलोड करायची ते आपण पाहूया

How to download online satbara? How to get 7/12 | ७/१२ Download करण्याची ऑनलाईन प्रक्रिया

  • सर्व प्रथम digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेत स्थळावर स्थळावर जा
  • डावीकडे “OTP Based Login” वर क्लिक करून Enter Mobile Number च्या रकान्यामध्ये आपला मोबाईल नंबर टाका आणि Send OTP या बटन वर क्लिक करा.
  • Enter OTP च्या रकान्यामध्ये आपल्या मोबाईल वर आलेला OTP नंबर टाका आणि Verify OTP बटन वर क्लिक करा.
  • आतल्या page मध्ये गेल्यानंतर “Recharge Account” बटन क्लिक करून netbanking किंवा Debit/Credit card वरून १५ रुपय Rechanrge करा
  • विचारलेली माहिती भरा; जिल्हा, तालुका, गाव, सर्वे नंबर /गट नंबर शोधा अशी सर्व माहिती भरल्यानंतर, रुपय १५ भरा आणि आपला ७/१२ उतारा Dowload करून घ्या.

 
अश्या रीतीने प्रत्येक शेतकरी आपला ७/१२ महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाइट digitalsatbara.mahabhumi.gov.in वर जाऊन डाउनलोड करू शकतो

सतत विचारले जाणारे प्रश्न

महाराष्ट्रात नावाने ७/१२ कसे शोधायचे?
भूमी अभिलेख विभागाच्या संकेत स्थळावर जावून आपला तालुका, जिल्हा, गाव निवडून आपल्याला खाली ६ पर्याय दिसतील (सर्वे नंबर, किंवा गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनाव किंवा संपूर्ण नाव) यामधील तुम्ही तुमचे नाव टाकून ७/१२ शोधू शकतात

सातबारा पाहण्यासाठी काय करावे लागेल?
सातबारा पाहण्यासाठी www.bhulekh.mahabhumi.gov.in संकेत स्थळावर जाऊन आपले Division निवडून आपला जिल्हा, तालुका, गाव निवडून सर्वे नं किंवा नाव किंवा आडनाव किंवा संपूर्ण नाव टाकून तुम्ही तुमचा ७/१२ बघू शकता

७/१२ बंद होणे झाला आहे काय?
भूमी अभिलेख विभागाच्या नवीन नियमानुसार शहरामध्ये आता ७/१२ बंद झाला आहे शहरात ७/१२ ऐवजी प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

2 Responses

    1. ७/१२ कसा शोधायचा हे timesmarathi.in मध्ये सविस्तर दिले आहे ते वाचून तुम्ही तुमची सर्व माहिती मिळवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणतीही महत्त्वाची बातमी कधीही चुकवू नका. आमची सदस्यता घ्या.

ताज्या बातम्या

केंद्र सरकार योजना

Related News