Education system in India: बदलत चाललेली शिक्षण व्यवस्था

Education system in India

Education system in India: रम्य! ते बालपण, रम्य! त्या आठवणी. लहानपण बोललो म्हणजे आठवण होते आपल्या मित्रांची, मित्रांबरोबर घालवलेल्या त्या क्षणाची, आठवण होते मामाच्या गावाची, दिवाळी आणि उन्हाळयाच्या सुट्टीची, त्या सुट्टी मध्ये खेळलेल्या खेळांची. त्या दिवसांची सर आज कुठे; त्या सुट्टी मध्ये स्वछंद्पणे जगलेले आयुष्य आठवले तर आजच्या पिढीच्या बालपणातल्या उणीवा प्रकर्षाने जाणवतात. आजच्या पिढीच्या मुलांचे बालपण हे मोबाइलपण झाले आहे. पिढीच्या मुलांचे बोलताना, चालतांना, झोपताना, जेवताना डोकं मोबाईल मध्ये घातलेलं बघितलं कि त्या दिवसांची उणीव हि जाणवते आणि चीडही येते. असो; बदल हे स्वीकारले पाहिजे मग ते आवडो अथवा न आवडो.

उन्हाळयाच्या सुट्टीनंतर जून महिना सुरु झाला कि मुलांची आणि मुलांच्या आई, बाबांची लगबग सूर होत नवीन पुस्तके, नवीन दप्तर, नवीन वह्या, पेन, कंपॉस घेण्याची, नवीन इत्ततेची नवीन पुस्तकांची पाने चाळतानाची मजा काही औरच होती, नवीन पुस्तकांचा हवा हवासा वाटणारा तो सुगंध घेऊन मुलं आपल्या नवीन इत्ततेची स्वप्न पाहत शाळा सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत असत. प्रत्येकजन आपल्या शाळेच्या जुन्या आठवणी मनाच्या कप्यामध्ये ठेवत असतो कारण या आठवणी मनोरंजनात्मक मनाची आयुष्यभर पुरेल अशी शिदोरीच असते.

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेचा संबंध हा येतच असतो, पहिल्यांदा स्वतःसाठी, आणि मग आपल्या मुलासाठी आणि नातवासाठी. कारण हि शाळाच आपल्याला जग दाखवते, जगातील माणसांना दाखवते, शाळा आपल्याला या जगामध्ये कसे राहायचे हे शिकवते, शाळा आपल्याला माणूस बनवते आणि जगातील माणसांमधील माणूस ओळखायलाही शिकवते. शाळेच्या अनेक व्याख्या असतील परंतु शिक्षण देण्याचे पवित्र काम करणाऱ्या या वास्तूला चपलक बसणारी व्याख्या म्हणजे “ज्या ठिकाणी पवित्र मानाने शिक्षण दिले जाते आणि पवित्र मानाने शिक्षण ग्रहण केले जाते अशा वास्तूला शाळा असे म्हणतात”

समाजाला ज्ञान देणाऱ्या शाळांचा वारसा खूप मोठा आहे, या शाळा वारसा सांगतात कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, धोंडो केशव कर्वे यांचा. या महान व्यक्तिनी समाजातील वंचित, बहुजन आणि स्त्रियांना शिक्षित करण्याचे पवित्र काम केले आणि तेही विनामूल्य. आताच्या पिढीसाठी ज्ञानरुपी गंगा या पृथ्वीतलावर घेऊन येणारे भगीरथ मिळणे तुरळकच, परंतु ज्ञान विकून लक्ष्मीला प्रसन्न करणारे कुबेर आज प्रत्येक शहरामध्ये दिसतील, समाज त्यांना शिक्षण सम्राट या नावाने ओळखतो.

आताच्या शिक्षणाचे व्यापारीकरण झाले आहे. या शिक्षणाच्या व्यावसायकीकरणामुळे विद्यार्थी भरडला जात आहे, पालक भरडले जात आहेत, या देशाचा भावी नागरिक ज्याचा शिक्षण घेणे जन्मसिद्ध हक्क आहे, पण त्याचा तो हक्क त्याच्या जवळ असणाऱ्या पैश्यावर अवलंबून आहे.

What is the role of a parent in education? पालकांची बदललेली मानसिकता

आज लोकांची मानसिकता बदललेली दिसत आहे याला कारणीभूत आहे समाजामधे “School आणि शाळा” बद्दल बनवण्यात आलेले मानवनिर्मित वातावरण. आजचा पालक आपल्या मुलांसाठी शाळा निवडताना बहुतेक वेळा मुलांच्या भविष्याचा विचार करण्याऐवजी आपल्या खोट्या प्रतिष्ठतेचा विचार करताना दिसतो. आपल्या मुलाच्या उद्याच्या प्रतिष्ठतेचा विचार करण्याऐवजी तो शाळेच्या प्रतिष्ठतेचा विचार करतो.

काळ जसा सरकतो तशी परिस्थिती सुद्धा बदलत असते. ९० च्या दशकातील पालकांमध्ये आपल्या विभागातील नावाजलेल्या शाळेमध्ये मुलाला टकण्याची ओढ दिसून यायची, मग २००० साल सुरु झाले, पालक मराठी माध्यमामधून English Medium School जाऊ लागले. आणि आता पालक ICSE, CBSE, ISC Board मध्ये आपल्या मुलाला टाकत आहेत. बरं! बहुतांश पालकांना ICSE, CBSE, ISC म्हणजे काय हे माहितीही नसते; परंतु त्याने त्याच्या मुलाला तिथे टाकले म्हणून मी टाकणार हि ओढ बळावत चालली आहे.

आपल्या मातृभाषेतून शिक्षण घेणे कमीपणाचे मानले जाते. आज आपण पाहिले तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जे यशस्वी लोक आहेत त्यामधील अर्ध्यापेक्षा जास्त अशी लोक आहेत ज्यांनी आपले शिक्षण आपल्या मातृभाषेमध्येच घेतले आहे. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी एका परिसंवादामध्ये सांगितले होते कि आपले प्राथमिक शिक्षण हे आपल्या  मातृभाषेमध्येच झाले पाहिजे, ज्या भाषेमध्ये आपण मनात विचार करतो ती आपली मातृभाषाच असते.  कोणत्याही गोष्टीचा खोल विचार करायचा झाला तर तो मातृभाषेमध्येच होतो. म्हणून आपल्या मातृभाषेत शिक्षण केव्हाही चांगले.

आताचे पालक भाषा आणि शिक्षण यामध्ये गल्लत करत आहेत, कारण बहुतांश पालकांचे आपल्या मुलाला इंग्रजी शाळेत टाकण्याचे कारण एकच असत, कि आपल्या मुलांना अख्खलीत इंग्रजी बोलता यावं, जागतिक बाजारपेठेत त्याने स्वतःला सिद्ध करावे. परंतु हे सर्व इंग्रजी शाळेतच मिळेल आणि मराठी शाळेत मिळणार नाही असा गैरसमज लोकांच्या मनामध्ये घर करून बसला आहे.  ज्ञान मिळवण्यासाठी भाषेचे बंधन नसते ते कोणत्याही भाषेत मिळू शकते.

इंग्रजी शिकले पाहिजे ती काळाची गरज आहे परंतु इंग्रजी शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमांमध्ये शिकने हा पर्याय नाही. मराठी शाळेत शिकून अख्खलीत इंग्रजी बोलणारे खूप उदाहरणे समाजामध्ये आहेत. हि मानसिकता बदलण्याची गरज आहे तेव्हा हा समाज बदलेल आणि आपल्या मुलांचे आणि पर्यायाने देशाचे भले होईल.

How is the education system in India? शाळांची बदललेली मानसिकता

२५-३० वर्षापूर्वी पालकांचा आणि शाळेचा, शाळेतील शिक्षकांचा संपर्क कोणत्या ना कोणत्या कारणाने होत असे परंतु आज शाळा आणि पालकांमधील संपर्क फी भारण्यापुरताच राहीला आहे का? कारण आज मुलांची शिक्षणातील प्रगती ही प्रगती पुस्तक मिळाल्यनांनंतरच कळते. बहुतांश शाळांमध्ये पालक मीटिंग नसते, मुलांच्या प्रगती बद्दल अद्ययावत केले जात नाही. आजच्या शिक्षण क्षेत्रमधील प्रकर्षाने जाणवणारा फरक म्हणजे शिक्षणाचे झालेलं व्यापारीकरण.

कोरोना सारख्या महामारीमध्ये तर शिक्षणाचे व्यापारीकरण जास्त प्रकर्षाने जाणवले. शाळा आणि तथाकथित शिक्षण सम्राट याच्यापुढे सरकारही थिटे आहे याची जाणीव झाली. ज्या सेवा वापरल्याही नाही त्याचीही किंमत सर्व शाळा कडून सराईत पणे उकळली गेली, म्हणजे पाहा किती बदलली आहे आपली शिक्षण व्यवस्था. संस्थेकडे विचारणा केली कि बोलले जाते शाळा बंद होती पण शाळेचा, स्कूल बसचा Maintainace (देखभाल खर्च) चालूच होता. म्हणजे मुलांची २ वर्ष वाया गेले त्याच्याबद्दल कुणीच बोलत नाही. या सर्व शाळांमध्ये English Medium शाळाच होत्या; या शाळा मुलांचे  भविष्य सुधारण्यासाठी आहे? कि पैसे कमवण्यासाठी? हेच कळत नाही.

Who has done great work in the field of education? शिक्षणा साठी आयुष्य वेचणाऱ्या महापुरुषांविषयी

आताची या बदलेली शिक्षण व्यवस्था पाहून मन व्याकुळ होते; आणि मनात विचार येतो कि हे सर्व पाहून कर्मवीर भाऊराव पाटील, सावित्रीबाई फुले, धोंडो केशव कर्वे यांच्या मनाला किती यातना झाल्या असत्या. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्व जाती-धर्माच्या गरीब मुलांसाठी रयत शिक्षण संस्था चालू केली, मुलांना “कमवा आणि शिका” हा मूलमंत्र दिला. वेळ प्रसंगी आपल्या पत्नीचे दागिने विकून मुलांचे शिक्षण थांबणार नाही याची काळजी घेतली.

आजच्या घडीला कर्मवीर भाऊराव पाटील यांची संस्था रयत शिक्षण संस्थेच्या ५०० हुन अधिक शाखा आहेत आणि या सर्व शाखेचे उद्धिष्ट एकच आहे; समजातील, तळागाळातील प्रत्येक घटकाला शिक्षणामध्ये सामावून घेणे. कर्मवीर भाऊराव पाटील हे इतक्या मोठ्या संस्थेचे संस्थापक होते; तरीही ते सर्व सामान्यांसारखेच राहिले, आताच्या शिक्षण सम्राटानसारखे करोडपती न्हवते, पण ते मनाने, मानाने आणि कर्तृत्वाने करोडपती होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्रथम आपल्या पत्नी सावित्रीबाई फुलें याना शिक्षण दिले आणि समाजातील मुलींना शिक्षण देण्यास प्रेरित केले. समाजातील विरोधाला न जुमानता, समाज कंठकांच्या हल्ल्याची तमा न बाळगता सावित्रीबाई फुलेंनी मुलींना शिक्षण देण्याचे पवित्र काम केले. त्या काळी मुलींना शिक्षण तर सोडाच कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य न्हवते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा फक्त समाजाच्या हितासाठी कार्य करणे, म्हणजे किती मोठे धारिष्टय हे. धोंडो केशव कर्वे यांनी सुद्धा माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. समाजसुधारण्याचा ध्यास असणारी लोकच अशी कामे करतात.

आजच्या शिक्षणं संस्था आपले मूळ कार्य विसरलेले दिसत आहेत; आपण या देशाचे उद्याचे नागरिक बनवत आहोत, देशाचे भविष्य सुरक्षित करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, या गोष्टींचा त्यांना विसर पडलेला दिसत आहे. आजच्या शिक्षणं संस्था या पैसे बनवण्याचे साधन झाल्या आहेत. एके काळचे पवित्र काम आज पैसे देऊनही पूर्ण मिळत नाही हि शोकांतिका आहे.

शिक्षणासाठी उंच इमारत, घरासमोर स्कूल बस, तीन वेगवेगळे स्कूल ड्रेस महत्वाचा नसतो. महत्वाचे असते शिक्षणं देणाऱ्याची आणि शिक्षण घेणाऱ्याची आत्मीयता, आदर आणि संस्कार. परीरस्थिती नुसार बदल हा निसर्गाचा नियमच आहे; त्याला तुम्ही आम्ही नाही बदलू शकत. परंतु; या व्यापारीकरनामुळे शिक्षण क्षेत्र आपले उद्धिष्ट आणि उद्देश विसरला आहे का? असा विचार मनामध्ये घर करून जातो.

Facebook
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp

Never miss any important news. Subscribe to our newsletter.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

कोणतीही महत्त्वाची बातमी कधीही चुकवू नका. आमची सदस्यता घ्या.

ताज्या बातम्या

केंद्र सरकार योजना

Related News