‘प्रत्येक शेताला पाणी’ हे ध्येय समोर ठेवून, केंद्र सरकारने PM Krishi Sinchayee Yojana pmksy 2024 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत नद्या जोडण्यासह, दीर्घकाळ प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करून शक्य असलेले सर्व पर्यायांवर विचार करण्यात आला आहे जेणेकरून पूर आणि दुष्काळामध्ये जलस्रोतांचा योग्य वापर करता येईल.
PM Krishi Sinchayee Yojana (pmksy) प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
भारत हा कृषी प्रधान देश आहे, आपल्या देशात १४ करोड १ लाख हेक्टर जमिनीवर शेत केली जाते आणि त्यामधील साडेसहा करोड हेक्टर म्हणजे ४५% जमीनीवर सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. म्हणजे आपल्या देशातील ५५% जमीन हि मान्सूनवर अवलंबून आहे, पाऊस चागला पड़ला तर पिक चांगले येते आणि जर पाऊस चांगला नाही झाला किवा दुष्काळ पड़ला तर पिक खराब होते.
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी “प्रत्येक शेतीला पाणी” पोहचवण्याचा संकल्प करून १ जुलै २०१५ रोजी पंतप्रधान कृषी सिंचन योजना PMKSY सुरू करण्यात आली. PMKSY योजना चालू योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आलेली योजना आहे.
या योजनेअंतर्गत येणाऱ्या चालू योजना उदा. जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन (MoWR,RD&GR) मंत्रालयाचा प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रम (AIBP), जमीन संसाधन विभागाचा (DoLR) एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP) आणि शेतीवर पाणी व्यवस्थापन (OFWM) कृषी आणि सहकार विभाग (DAC).
ज्या भागातील शेती मान्सूनवर अवलंबून आहे तिथे शेती करणे जोखमीचे आणि कमी उत्पादनाचे साधन झाले आहे. पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत मुख्यत्वे सिंचन स्रोत विकसित करणे, पाण्याचे योग्य वितरण करणे आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे या गोष्टींचा विचार केला आहे. शक्य असेल तिथे नद्या जोडणे, प्रलंबित असलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करणे तसेच पाऊसाचे पडलेलं पाणी साठवणे या गोष्टींचा समावेश पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमध्ये येतो.
Objective of PM Krishi Sinchayee Yojana (pmksy) पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे उद्दिष्ट
शेतीतील पाण्याच्या वापराची कार्यक्षमता वाढवणे तसेच पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे हे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे PMKSY चे प्राथमिक उद्दिष्ट आहे. सर्व शेत जमीनी सिंचनाखाली आणून लागवडीयोग्य क्षेत्राचा विस्तार करून सर्व क्षेत्रांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढवणे, कार्यक्षमता सुधारणे व यावर लक्ष केंद्रित करणे हे पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे उद्दिष्ट आहे.
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेची (PMKSY) उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
- क्षेत्रीय स्तरावर, सिंचन गुंतवणुकीच्या खर्चाचे अभिसरण करणे, प्रत्येक जिल्याच्या स्तरावर आणि जर आवश्यकता असेल तर उपजिल्हा स्तरावरील पाणी वापर योजना तयार करणे
- “प्रत्येक शेतीला पाणी” या घोषवाक्याप्रमाणे शेतातील पाण्याची भौतिक प्रवेश वाढवा आणि विश्वसनीय सिंचनाने लागवडीसाठी योग्य शेती क्षेत्र वाढवे
- योग्य तंत्रज्ञान आणि कार्यपद्धतीच्या वापराने पाण्याचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी जलस्रोत, जल वितरण व पाण्याचा कार्यक्षम वापर
- पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी आणि पाण्याचा कालावधी वाढवण्यासाठी पाण्याच्या वापराची परिणामकारकता वाढवणे
- ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर सारख्या पाणी-बचत तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे
- पेरी-शहरी शेतीसाठी पालिकेचे प्रक्रिया केलेले सांडपाणी पुन्हा वापरु शकतो कि नाही हे तपासणे
- जल सिंचनासाठी जास्तीत जास्त खाजगी निधीला प्रोत्साहन देणे
- मृदा आणि जलसंधारण, भूजल पुनरुत्पादन, प्रवाह खंडित (बंद) करणे आणि उपजीविकेसाठीचे पर्याय प्रदान करण्यासाठी पाणलोट दृष्टीकोन वापरून पावसाच्या क्षेत्राचा एकात्मिक विकास करणे.
- जलसंधारण पद्धती लागू करणे आणि जलचर पुनर्भरण सुनिश्चित करणे
- जास्त पाणी असलेल्या ठिकाणाहून पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी स्त्रोतांमधून पाणी वळवले जाऊ शकते तसेच सिंचन आदेशाची पर्वा न करता IWMP आणि MGNREGA च्या गरजा पूर्ण करण्यासाठी नद्यांमधून अथवा कमी उंचीवरील जलकुंभामधून पाणी उचलले जाऊ शकते.
PM Krishi Sinchayee Yojana pmksy पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे घटक:
“प्रत्येक शेतीला पाणी” या उद्देशाने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) सुरू करण्यात आली आहे, जलस्रोताचा विकास, पाणी वितरण नेटवर्क आणि शेती स्तरावरील पाण्याचे योग्य व्यवस्थापन, या तीन गोष्टी यशस्वी करण्यासाठी यामध्ये चार घटकांचा समावेश केला गेला आहे, ते म्हणजे
(i) प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रम (AIBP),
(ii) प्रत्येक शेताला पाणी (HKKP)
(iii) पीक प्रति ड्रॉप (PDMC):
(iv) एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP):
- प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रम (AIBP):
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यात चालू असलेले किंवा रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे हे प्रवेगक सिंचन लाभ कार्यक्रम (AIBP) चे उद्दिष्ट आहे. AIBP अतिरिक्त सिंचन क्षमता निर्माण करण्यात आणि शेतकऱ्यांना लाभ देणारे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. - प्रत्येक शेताला पाणी (HKKP):
HKKP अंतर्गत नवीन जलस्त्रोत बनवणे, अधिपासूनचे जे जलस्त्रोत आहेत त्यामध्ये सुधारणा, नूतनीकरण करणे, पावसाचे पाणी अडवून पाण्याची साठवणूक करून भूजल साठा वाढवणे तसेच या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे. या गोष्टी प्रत्येक शेताला पाणी या घटकात केल्या जातात. याचा मुख्य उद्देश म्हणजे पाणी बचत तंत्रज्ञान आणि पद्धतींचा प्रचार करून पाणी-वापर कार्यक्षमता वाढवणे आहे. - अधिक पीक प्रति ड्रॉप (PDMC):
अधिक पीक प्रति ड्रॉप (PDMC) या घटकामध्ये पाण्याची बचत आणि कमी पाण्यामध्ये जास्तीतजास्त पिकांना पाणी देण्यावर भर दिला आहे. ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचन सारख्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देते हे अचूक सिंचनावर भर देते आणि जलस्रोतांचा वापर सुनिश्चित करते. सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाण्याबरोबर, मेहनत आणि कच्चामालाचा खर्च हि कमी येतो. - एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम (IWMP):
IWMP चे उद्दिष्ट जमिनीतील आर्द्रता राखणे आणि नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत विकासाला चालना देणे हे आहे. पाणलोट विकास उपक्रमांमध्ये वनीकरण, मृदा संवर्धन आणि पावसाचे पाणी साठवणे यांचा समावेश होतो, ज्यामुळे कृषी उत्पादन वाढवण्यास मदत होते.
How is PMKSY connected with WDC? प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY-WDC) सह अभिसरणात पाणलोट विकास:
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) सिंचनाची व्याप्ती वाढवण्यासाठी तयार करण्यात आली आहे, पाणी वापर कार्यक्षमतेच्या सुधारणासाठी ‘प्रत्येक थेंब अधिक पीक’ यावर भर देण्यात आला आहे कारण भारत सरकार जलसंवर्धन व त्याच्या व्यवस्थापनाला प्राधान्य देत आहे. हा घटक पाणलोट व्यवस्थापन आणि सिंचन विकासामध्ये समन्वय साधण्यासाठी पाणलोट विकास घटकासह PMKSY च्या अभिसरणावर भर देतो.
What is the implementation of Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana? पंतप्रधान कृषी सिंचन योजनेची अंमलबजावणी आणि निधी:
पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाद्वारे लागू केली जाते. ही योजना ग्रामीण भागासह आणि शहरी भागातही लागू करण्यात आली आहे, या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे महत्त्वाचे भागधारक आहेत.
योजनेसाठीचा निधी केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये सामायिकपणे केला जातो, ज्याचे प्रमाण राज्यांच्या श्रेणीनुसार बदलते. सर्वसमावेशक विकास सुनिश्चित करण्यासाठी पूर्वोत्तर राज्ये, डोंगराळ भाग आणि आदिवासी भागांसाठी निधीत विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत.
Impact on agriculture of Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा शेतीवर परिणाम:
- बागायत क्षेत्रात वाढ:
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमुळे सिंचन क्षेत्राचा विस्तार वाढला आहे, शेतकऱ्यांना आपल्या पिकांसाठी सातत्यपूर्ण पाणीपुरवठा करण्यात या योजनेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पिकांची तीव्रता वाढली आहे, कृषी उत्पादनात सुद्धा वाढ झाली आहे. कृषी सिंचन योजनेमुळे बहुतांश जमिनी पाण्याखाली आल्या आहेत म्हणून बागायत क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. - पाणी वापर कार्यक्षमतेत वाढ:
पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत जल-कार्यक्षम तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारने प्रेरित केल्याने पाणी वापर कार्यक्षमता वाढली आहे. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब केल्याने पिकांना मुबलक पाणीही मिळत आहे आणि पाण्याची बचतही होत आहे.
Who are the beneficiaries of Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana? पंतप्रधान कृषी सिंचन योजनेचे लाभार्थी
कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढवण्यासाठी व शेतकऱ्यांना शेती करत असताना येत असणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून केंद्र सरकारकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजना आखण्यात आली आहे, या योजनेसाठी कोण लाभार्थी आहेत ते आपण पुढे पाहू.
- शेतकरी फक्त भारतीय नागरिक असावा
- लाभार्थी हा शेतकरी असावा मग तो कोणत्याही वर्गातील किंवा विभागातील असला तरी चालेल
- ज्या शेतकऱ्यांच्या मालकीची जमीन आहे
- ट्रस्ट, सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक गटांचे सदस्य
- भाडेतत्त्वावर शेत जमिनीवर शेती करणारे शेतकरी
Documents Required for the PMKSY प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेतखाली दिले आहेत.
- पत्ता पुरावा Address proof
- आधार कार्ड
- शेत जमिनीचे कागद
- अधिवास प्रमाणपत्र Domicile Certificate
- मोबाईल नंबर
- बँक खाते पासबुक
- जातीचा दाखला
- पासपोर्ट फोटो
FAQ : सतत विचारले जाणारे प्रश्न
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना कधी सुरू झाली?
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना १ जुलै २०१५ रोजी सुरू करण्यात आली
प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचा उद्देश काय आहे?
जास्तीत जास्त जमीनीचे क्षेत्र सिंचनाखाली यावे हे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेचे मुख्य उद्देश आहे
PMKSY चे घोषवाक्य काय आहे?
PMKSY चे घोषवाक्य “हर खेत को पाणी” आहे