पंतप्रधान विश्वकर्मा योजना PM Vishwakarma Yojana हा केंद्र सरकारचा एक दूरदर्शी उपक्रम आहे, ज्याचा उद्देश भारतातील कुशल कामगार आणि कारागीर यांचे सक्षमीकरण करणे आहे. या योजनेचे फायदे काय आहे व ही योजना कोणासाठी आहे ते आपण पाहू.
भारत देश हा कला व विविध परंपरेने नटलेला आहे, आपल्या देशात असे अनेक कलाकार आणि कारागीर आहेत जे आपल्या कलेमध्ये पारंगत आहेत, इतिहासामध्ये अशा अनेक कलाकार, कारागीर आणि कामगारांचे दाखले दिले आहेत जे राज दरबारी असत. त्यामुळे आपल्या परंपरेमध्ये कलाकार, कारागीर आणि कामगारांचे महत्व अदोरेखित होते. या लेखात, पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या मुख्य पैलू, उद्दिष्टे आणि परिणामांबद्दल सांगितले आहे तसेच कुशल कामगार व त्यांच्या उज्वल भविष्य घडवण्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे.
what is PM Vishwakarma Yojana? पीएम विश्वकर्मा योजना काय आहे?
भारत देशाला पारंपारिक कला आणि हस्तकलेचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे, या पारंपारिक कलेचे, कौशल्यांचे जतन करणे, त्याचे रक्षण करणे गरजेचे आहे कारण ती आपली संस्कृती आहे.या कलांचे अस्तित्व टिकवण्यासाठी कुशल कारागीरांचे अस्तित्व टिकणे जास्त गरजेचे आहे. आणि म्हणूनच भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी १७ सप्टेंबर २०२३ रोजी पी एम विश्वकर्मा योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत हस्तकला करणाऱ्या कुशल कारागीरांचा समाविष्ट करण्यात आला आहे.
पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेंतर्गत पात्र लोकांना ५ टक्के सवलतीच्या व्याज दराने ३ लाखापर्यंतचे कर्ज सरकारकडून दिले जाईल. पहिल्या टप्प्यात पात्र व्यक्तींना १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांचे कर्ज दिले जाईल.
या योजनेअंतर्गत, सर्व पात्र व्यक्तींना कौशल्य पडताळणीनंतर ५ दिवसांचे मूलभूत Basic Training प्रशिक्षण आणि १५ दिवसांचे प्रगत Advance Training प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणासाठी दररोज ५०० रुपये भत्ता दिला जाईल. प्रशिक्षण उपकरणे खरेदीसाठी प्रोत्साहन म्हणून १५००० रुपये अनुदान देण्याचीही सुविधा आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे आहे.
“PM Mudra Loan for New Business पंतप्रधान मुद्रा योजना” सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
What is the main objective of the PM Vishwakarma scheme? पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची उद्दिष्टे:
पीएम विश्वकर्मा योजना सुरु करण्यामागील केंद्र सरकारची काही उद्दिष्ट आहेत. केंद सरकारने काय विचार करून हि योजना सुरु केली आहे ते आपण सविस्तरपणे पाहू.
- कौशल्य विकास Skill Development: विविध क्षेत्रातील कारागीर आणि कुशल कामगारांच्या कौशल्यांमध्ये वाढ करणे हा पीएम विश्वकर्मा योजनेचा प्राथमिक उद्देश आहे. आताच्या स्पर्धात्मक युगात कुशल कारागीर कुठेही मागे राहिला नाही पाहिजे म्हणून त्यांना प्रगत प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांमधून उद्योगाच्या विकसित होणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यास सक्षम बनवणे व कामगारांना अधिक स्पर्धात्मक बनवणे हे या या योजनेचे उद्दिष्ट
- रोजगार निर्मिती Employment Generation: कुशल कामगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे हे या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आपले लक्ष साध्य करण्याबरोबर, आर्थिक वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे पारंपारिक आणि आताच्या कलाकृतींमध्ये रोजगाराच्या नवीन संधी वाढतील.
- आर्थिक सक्षमीकरण Economic Empowerment: पीएम विश्वकर्मा योजना कारागीर आणि कुशल कामगारांना आर्थिक सहाय्य आणि समर्थन प्रदान करून त्यांना आपल्या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करते. यामध्ये कामगारांना क्रेडिट सुविधा तसेच अनुदाचा समावेश आहे, ज्यामुळे कामगारांना नवीन उपकरणे खरेदी करण्यास आणि त्यांच्या कार्याचा विस्तार करण्यास मदत होईल
- पारंपारिक कला आणि हस्तकलेचे जतन Preservation of Traditional Arts and Crafts: पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये भारतातील पारंपारिक कला आणि हस्तकलांमध्ये असलेला समृद्ध सांस्कृतिक वारसा याचा विचार करता, या कौशल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यावर भर दिला आहे. आपल्या जुन्या हस्तकला सुरू ठेवण्यासाठी तसेच त्याला प्रोत्साहन देऊन, आपल्या सांस्कृतिक विविधतेचे रक्षण करणे आणि पारंपारिक कारागिरीचे अस्तित्व टिकवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे.
PM Vishwakarma Yojana Key Components: पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे प्रमुख घटक:
- कौशल्य संवर्धन कार्यक्रम skill development programs: पीएम विश्वकर्मा योजनेमध्ये विविध क्षेत्रांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन त्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम केले जातात. या कार्यक्रमांमध्ये पारंपारिक कारागिरीपासून आधुनिक तंत्रज्ञानासह काम करणाऱ्या कारागिरीचा समावेश केला जातो, ज्यामुळे कारागिरांच्या कौशल्य विकास वाढण्यास मदत होते आणि वेगाने बदलणाऱ्या आर्थिक परिस्थितीत कर्मचारी टिकून राहतो.
- आर्थिक सहाय्य आणि सबसिडी Financial Assistance and Subsidy: वेगवेगळ्या क्षेत्रातील परंपरागत कारागिरांना आपले काम करत असताना अनेक वेळा आर्थिक अडथळ्यांचा सामना करावा लागतो म्हणून त्यांची आर्थिक अडचण दूर करण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत कारागीर आणि कुशल कामगारांना आर्थिक सहाय्य आणि अनुदान (Subsidy) प्रदान करण्यात येते. यामध्ये कच्चा माल आणि तंत्रज्ञान सुधारणांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे कारागिरांना आपल्या व्यवसायत आधुनिकीकरण आणून आपली उत्पादकता वाढवता येते.
- उद्योजकता विकास Entrepreneurship Development: पंतप्रधान विश्वकर्मा योजना कुशल कामगारांमध्ये उद्योजकता वाढवण्यावर भर देते. ही योजना लहान उद्योग उभारण्यासाठी कारागिरांना प्रशिक्षण आणि समर्थन देते, त्याचबरोबर व्यवसायाचे व्यवस्थापन, बाजारपेठेबद्दलची माहिती करून दिली जाते. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी कारागिरांना सरकारी योजनांची माहिती देऊन त्याचा लाभ कसा घ्यावा याचे मार्गदर्शन या योजनेमार्फत केले जाते
- तंत्रज्ञानाचा अवलंब Adoption of New Technology: उत्पादकता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यात तंत्रज्ञानाची भूमिका फार महत्वाची आहे म्हणून या योजनेअंतर्गत आधुनिक तंत्रांचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञान सुधारणांच्या खरेदीसाठी आर्थिक सहाय्य केले जाते, जेणेकरून कारागीर आणि कुशल कामगार जागतिक बाजारपेठत लागणारी गती राखू शकेल व स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवेल
PM vishwakarma yojana eligibility criteria पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र आहे?
- असंघटित क्षेत्रात साधन आणि हाताने काम करणारा आणि योजनेत नमूद करण्यात आलेल्या पारंपरिक व्यवसायात काम करणारा कारागीर
- लाभार्थ्यांचे वय किमान १८ वर्ष पूर्ण असावे
- लाभार्थ्यांने PMEGP, PM SVA Nidhi, Mudra या सरकारी योजनेअंतर्गत कर्ज घेतलेले नसावे
- या योजनेअंतर्गत कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला लाभ मिळेल
- सरकारी नोकरीत असणाऱ्या व्यक्ती किंवा त्याचे कुटुंब पात्र असणार नाही
PM Vishwakarma Yojana विश्वकर्मा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
या योजनेअंतर्गत पुढे दिलेल्या 18 सेक्टरमध्ये काम करणारे लोक याचा लाभ घेऊ शकतात.
गवंडी | न्हावी |
माळी | धोबी |
शिंपी | लॉकस्मिथ |
सुतार | लोहार |
सोनार | कुंभार |
शिल्पकार | जोडा/बूट बनवणारे (चांभार) |
बोट बनवणारे | टोपली/चटई/झाडू बनवणारे |
खेळणी बनवणारे | हातोडा आणि टूलकिट तयार करणारे |
फिशिंग नेट उत्पादक |
PM Vishwakarma Yojana Benefits पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजनेचे फायदे
- प्रमाणपत्रासहित विश्व्कर्मा म्हणून ओळख
- ७-१५ दिवस प्रशिक्षण आणि प्रशिक्षण वेतन प्रतिदिन ५०० रुपये
- उपकरणे खरेदीसाठी प्रोत्साहन म्हणून १५००० रुपये अनुदान
- ५ टक्के सवलतीच्या व्याज दराने दोन टप्यात १ लाख व २ लाख कर्ज
- डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन जास्तीत जास्त १०० व्यवहारासाठी प्रति व्यवहार १ रुपये महिना
- जाहिरात, व्यापार मेळावे इ. सेवा
What documents are required for Vishwakarma PM Yojana पंतप्रधान विश्वकर्मा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
- निवासी प्रमाणपत्र (Residential Certificate)
- कौशल्य प्रमाणपत्रे
- शिधापत्रिका (Ration Card)
- आधार कार्ड
- आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर
- बँक पासबुक
- खाते क्रमांक
- जात प्रमाणपत्र
- पासपोर्ट साईझ फोटो
How to register PM Vishwakarma? प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी कशी करावी
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी नोंदणी आणि अर्ज कसा करायचा याची माहिती खाली दिली आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी, ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी CSC आय डी गरजेची आहे कारण CSC आय डी शिवाय आपण नोंदणी करू शकत नाही म्हणून तुमच्या जवळ CSC आय डी नसेल तर CSC केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करून घ्या. खाली दिलेल्या पद्धतीनुसार तुम्ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करू शकता आणि या योजनेचा लाभ घेऊ शकता.
- मोबाइल आणि आधार पडताळणी Mobile and Aadhaar Verification : तुम्ही तुमचा मोबाईल ऑथेंटिकेशन आणि आधार EKYC करा
- कारागीर नोंदणी फॉर्म Artisan Registration Form: नोंदणी फॉर्मसाठी अर्ज करा
- पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र PM Vishwakarma Certificate : पीएम विश्वकर्मा डिजिटल आयडी आणि प्रमाणपत्र डाउनलोड करा
- योजनेच्या घटकांसाठी अर्ज करा Apply for scheme components : वेगवेगळ्या घटकांसाठी अर्ज करणे सुरू करा
FAQ : सतत विचारले जाणारे प्रश्न
काय आहे विश्वकर्मा योजना?
विश्वकर्मा योजनेअंतर्गत कुशल कारागिरांना प्रशिक्षणासह आर्थिक सहायता केली जाते
विश्वकर्मा योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो?
विश्वकर्मा योजनेअंतर्गत येणाऱ्या 18 सेक्टरमध्ये काम करणारे लोक याचा लाभ घेऊ शकतात.
विश्वकर्मा योजना कधी सुरू होणार?
विश्वकर्मा योजना १७ सप्टेंबर २०२३ पासून सुरू झाली आहे
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे फॉर्म कधी भरले जातील?
विश्वकर्मा योजनेचे फॉर्म १७ सप्टेंबर २०२३ पासून भरले जातील