गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana ही महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली विमा योजना आहे. या योजनेअंतर्गत वहितीदारक खातेदार शेतकरी व वहितीदारक खातेदार म्हणून नोंदणी नसलेला घरातील कोणताही १ सदस्य ज्यांचे (वय १० वर्ष ते ७५ वर्ष) वयोगटातील प्रत्येकी २ जणांना या योजनेचा लाभ मिळेल.
या योजनेत रस्ते आणि रेल्वे अपघात, नक्षलवादी हल्ले, दंगल, उंचावरून पडून झालेला अपघात, साप चावणे, विंचू चावणे, विजेचा शॉक किंवा वीज पडूने, जनावरांनी खाल्याने अथवा त्यांच्या चावण्याने जखमी किंवा मृत्यू होणे यासारख्या अपघातांचा समावेश आहे.
या योजनेत अपघाताने मृत्यू अथवा अपंग झालेल्या शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांच्या वारसाचा समावेश केला गेला आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत शेतकर्यांना रु. २ लाख आणि अपघातामुळे झालेल्या अंशत: अपंगत्वासाठी १ लाख रुपये शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मिळणारी राशी RTGS द्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana सानुग्रह अनुदान म्हणजे काय?
शेती व्यवसाय करत असताना अनेकवेळा नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्याचे अपघात होतात आणि या अपघातामध्ये बरेचदा शेतकऱ्याना कायमचं अपंगत्व येते किंवा मृत्यूही होतो. अपघाताने घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपंगत्वाने किंवा मृत्यूने कुटुंबातील आर्थिक उत्पन्न बंद होते,
आशा कुटुंबांसाठी कोणतीहि स्वतंत्र विमा योजना नसल्याकारणाने २००५-०६ पासून महाराष्ट्र शासनानं अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी विमा योजना सुरु केली.
सन २००५-०६ पासून सन २००८-०९ पर्यंत या योजनेला शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना या नावाने ओळखलं जात होते, सन २००९-१० मध्ये या योजनेचे नाव बदलून शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आलं.
सन २०१५-१६ पासून सदर योजना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना या नावाने ओळखली जाऊ लागली.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही सुरवातीला विमा कंपनी आणि विमा सल्लागार यांच्यामार्फत राबविण्यात येत होती. परंतु शेतकऱ्याच्या तक्रारी वाढत होत्या कारण विमा कंपन्यांकडून आणि विमा सल्लागार यांच्याकडून शेतकऱ्याना योग्य ते सहकार्य मिळताना दिसत न्हवते.
वेळेत दावे मंजूर न करणे, कोणत्याही कारणाने दावे नामंजूर करणे इत्यादी कारणामुळे शेतकरी लाभापासून वंचित राहत किंवा त्यांना विमा रक्कम वेळेत मिळत नसे ई. यामुळे शासनाबाबत शेतकऱ्यांचा रोष वाढताना दिसत होता.आशा अनेक बाबी शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे आणि शासनाने पाठपुरावा करूनही काही सुधारणा होताना दिसत नाही तसेच शेतकऱ्यांना योग्य सेवा मिळत नसल्यामुळे योजनेचा मुख्य हेतू सफल होताना दिसत नाही.
शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारणा करून दिनांक १७ मार्च, २०२३ रोजी पासून “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना” या नावाने राबवण्यास सुरवात केली.
“PM Kisan Samman Nidhi Yojana पंतप्रधान किसान सम्मान योजना” सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana 2024 पात्रता निकष काय आहेत?
कृषी जणगणने नुसार वहितीदारक खातेदार शेतकरी व वहितीदारक खातेदार म्हणून नोंदणी नसलेला घरातील कोणताही १ सदस्य असे मिळून (वय वर्ष १० ते ७५ वयोगटातील) २ जणांना सदर योजनेचे लाभ मिळतील, या योजने अंतर्गत कुटुंबातील वहितीदारक खातेदार म्हणून नोंद नसलेले १ व्यक्ती म्हणजे आई/वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा/अविवाहित मुलगी याना ग्राह्य धरले जाईल.
अपघात ग्रस्त शेतकऱ्याचे निधन झाल्यास अपघात ग्रस्त शेतकऱ्याची पत्नी/पती, अविवाहित मुलगी, मुलगा, सून, आई, वडील अथवा अन्य कायदेशीर वारसदार यामधील कोणत्याही एका वारसदाराला प्राध्यान्य क्रमानुसार सानुग्रह अनुदानाचा निधी अदा केला जातो. परंतु कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने किंवा वारासदारने शासनाच्या अन्य विभागाकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या इतर योजनेचा लाभ घेतला असल्यास असा लाभार्थी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या लाभास पात्र ठरणार नाही.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana योजनेमध्ये समाविष्ट असणारे अपघात (मृत्यू) कारणे
- रस्ते/रेल्वे अपघात
- पाण्यात बूडून मृत्यू
- जुंतूनाशके हाताळताना किंवा इतर कारणाने झालेली विषबाधा
- विजेचा धक्का लागून अथवा वीज पडून झालेला अपघाती मृत्यू
- खून अथवा नक्षलवाद्यच्या हल्यात झालेला मृत्यू
- उंचावरून पडून झालेला अपघात
- साप अथवा विंचू चावन्याने
- जनावरांनी खाल्याने अथवा त्यांच्या चावण्याने जखमी किंवा मृत्यू
- बाळंतपणातील मृत्यू अन्य.
सदर योजनेअंतर्गत वरील अपघात समाविष्ट केले आहेत.
Gopinath Munde Shetkari Apghat Vima Yojana योजनेमध्ये समाविष्ट नसणारे अपघात (मृत्यू) कारणे
- नैसर्गिक मृत्यू
- आत्महत्या अथवा आत्महत्येचा प्रयत्न
- विमा काढण्याआधीचे अपंगत्व
- वैयक्तिक वैमनश्यातून झालेला खून
- कायद्याविरुद्ध गुन्ह्यामध्ये आलेलं अपंगत्व अथवा मृत्यू
- अमली पदार्थाच्या सेवनाने झालेलं अपघात
- मोटार शर्यत अपघात
- युद्ध अथवा सैन्यातील नोकरीमुळे झालेलं अपघात
सदर योजनेअंतर्गत वरील अपघात समाविष्ट केले गेले नाहीत.
Shetkari apghat vima yojana documents अर्जासोबत लागणारे आवश्यक कागदपत्रे
- शेत जमिनीचा ७/१२ उतारा
- मृत्यू झालेल्या (शेतकरी) व्यक्तीचा मृत्यूचा दाखला
- तलाट्याकडील कामगार तलाठ्याकडील गाव नमुना नुं. ६- क नुसार मुंजूर झालेली वारस नोंद
- शेतकऱ्याचे शाळा सोडल्याचा दाखला / आधार कार्ड / निवडणूक ओळखपत्र ई.
- प्रथम माहिती अहवाल अथवा पोलीस पाटील माहिती अहवाल
- अपघातात मृत्यू अथवा जखमी झाले असल्यास चौकशी अहवाल, शव विच्छेदन अहवाल, शव विच्छेदन झाले नसेल तर वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, प्रथम माहिती अहवाल, औषध उपचाराची कागदपत्रे, डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र, पोलीस अंतिम अहवाल
- नक्षलवाद्यकडून हत्या झाली असेल तर नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्र ई.
- अपघातात अपंगत्व आले असेल तर अपंगत्व अथवा अवयव निकामी होण्याचे कारणबाबत चे डॉक्टर प्रमाणपत्र
टीप: मृत्यूचे स्वरूप आणि कारणानुसार वरील कागदपत्रे सादर करावी लागतील, सादर केलेली कागदपत्रे हे संबंधीत कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केलेली असतील तरच ते ग्राह्य धरले जातील
gopinath munde apghat vima yojana application form योजनेसाठी अर्ज कसा करू शकतो?
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्याच्या वारसदारांनी अपघात झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत अर्जासोबत संबंधित सर्व कागदपत्रे घेऊन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावे. अर्ज सादर करण्याआधी कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अथवा कर्मचारी यांच्याकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी जेणेकरून कागदपत्रांमधील त्रुटीमुळे मिळणाऱ्या आर्थिक मदतीला विलंब लागण्याची शक्यता असते.
प्राथमिक माहिती प्राप्त झाल्यानंतर महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांचे पथक घटनास्थळी भेट देऊन घडलेल्या घटनेची माहिती घेऊन त्याचा अहवाल बनवतात आणि घटना झाल्यानंतर ८ दिवसाच्या आत तहसीलदार याना सादर करतात.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीमध्ये संबंधीत अहवाल सादर केला जातो आणि चर्चा करून मदत देण्याबाबत निर्णय घेतला जातो आणि ३० दिवसाच्या आत संबंधित शेतकरी वारसदाराच्या बँक खात्यामध्ये निधी पाठवला जातो.
Gopinath Munde insurance scheme योजनेअंतर्गत देण्यात येणारी देय रक्कम किती असेल
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत देण्यात येणारी देय रक्कम हि सदर योजने अंतर्गत येणाऱ्या अपघातामध्येच दिली जाईल, तहसीलदार कार्यालया तर्फे संघटित करण्यात आलेले पथक घटनास्थळी जाऊन माहिती घेऊन मुखत्वे अपघाताच्या बाबी लक्ष्यात घेऊन अहवाल बनवते आणि तो तहसीलदार कार्यालयामध्ये सुपुर्त करते.
तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणाऱ्या बैठकीमध्ये अहवाल आणि सदर योजनेअंतर्गत येणारे अपघात व त्याच्या बाबी लक्षात घेऊन म्हणजे अपघातामध्ये मृत्यू झाला अथवा अपघातामध्ये दोन डोळे, दोन हात किंवा दोन पाय निकामी झाले तर शासनाकडून रु. २,००,०००/-, किंवा अपघातामध्ये एक डोळे, एक हात किंवा एक पाय निकामी झाले तर रु. २,००,०००/- किंवा रु. १,००,०००/- बैठकीमध्ये देय ठरवले जाते आणि ३० दिवसाच्या आत संबंधित शेतकरी अथवा वारसदाराला ठरलेली रक्कम संबंधित बँक खात्यामध्ये पाठवला जातो.
FAQ – सतत विचारले जाणारे प्रश्न
शेतकरी आपघात विमा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
शेतकऱ्याचे अपघातामध्ये बरेचदा मृत्यू किंवा कायमचं अपंगत्व येते आशा वेळी घरातील कर्त्या व्यक्तीच्या अपंगत्वाने किंवा मृत्यूने कुटुंबातील आर्थिक उत्पन्न बंद होते आणि आशा कुटुंबांसाठी कोणतीहि स्वतंत्र विमा योजना नसल्याकारणाने महाराष्ट्र शासनानं अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी विमा योजना सुरु केली.
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा फॉर्म कुठे मिळेल?
जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा फॉर्म मिळेल
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत किती अनुदान प्राप्त होते?
अपघात व त्याच्या बाबी लक्षात घेऊन रु. १ लाख अथवा रु. २ लाख इतके अनुदान प्राप्त होते